फक्त खाजवत बसु नका! ‘हा’ घरगुती उपाय करून मिळवा खाज, खरूज, गजकर्णपासून सुटका 

अनेक लोकांना त्वचे संबंधीत रोगांचा सामना करावा लागत आहे. खाज, खरुज, गजकर्ण, नायटा अशाप्रकारच्या समस्या आहेत. हे त्वचारोग एकदा झाल्यानंतर सहजासहजी बरे होत नाहीत. या रोगांमुळे अनेक लोक  हैराण झाले आहेत. परंतु योग्य वेळी काळजी घेतली तर यापासून कायमची सुटका देखील  मिळवता येईल कारण हा रोग बरा होत नाही असे काही नाही.

गजकर्ण व  खाज ही सतत ओलसर राहणाऱ्या ठिकाणी जास्त प्रमाणात येत असते. पोट मान, पायाच्या काही भागात, जांघेत किंवा सतत झाकले जात असलेल्या जागी येते.  गोलाकार पसरणारा चट्टा येतो. ज्या ठिकाणी चट्टा येतो त्या ठिकाणची त्वचा काळवंडते आणि खूप खाज सुटते.

अशाप्रकारचे आजार का होतात हे माहिती असणे गरजेचे   आहे. बुरशीमुळे होणारा हे आजार आहेत. मुख्य म्हणजे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची कमतरता, ओली कपडे घातल्यामुळे सुध्दा , दुसऱ्याचे कपडे वापरण्यात आल्याने या त्वचेंच्या आजाराची सुरुवात होते.

हा  त्वचेचा  रोग दुर्लक्ष   केल्याने याचे स्वरुप गंभीर होते. त्यामुळे योग्य वेळी  उपचार घेणं गरजेचे आहे. वेळेत उपचार घेणे हा या आजारापासून मुक्त होण्याचा मार्ग आहे. त्यासाठी या त्वचा रोगांची लक्षणं काय आहेत हे माहित असणं गरजेचं आहे. हे त्वचा रोग कंबर, पोट, मांड्या, जांघा इत्यादी भागात जास्त वेगाने पसतरतो. ज्या ठिकाणी चट्टे पडले आहेत त्या ठिकाणी  खूप खाज सुटते तसेच चट्टा पडून त्या चट्ट्याची वाढ झपाट्याने होते.

अनेक लोक या आजाराने त्रस्त आहेत यावर उपाय शोधत आहेत. तर या रोगांवरील सर्व उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे. आयुर्वेदातील उपचार घरगुती उपाय यावर सुद्धा डॉक्टरांचा सल्ला गरजेचा आहे.

गजकर्ण व नायटा बरे होण्यासाठी त्वचा ही  कोरडी व स्वच्छ कशी राहिल या गोष्टीची  काळजी घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी खाज होते  तो भाग स्वच्छ धुतलेला असावा. या आजारापासून आराम मिळन्यासाठी  झेंडू खूप फायदेशीर आहे. कारण झेंडूच्या फुलामध्ये  अनेक अँटीफंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे खाज, खरुज, गजकर्ण सारख्या समस्या मुळापासून नष्ट होण्यास मदत होते.

झंडूची पाने गरम पाण्यामध्ये उकळवून नंतर ते थंड पाणी ज्या ठिकाणी खाज होत आहे त्या ठिकाणी लावावे. तसेच झंडूची फुले कुटून त्यांची पेस्ट आणि लेप ज्या ठिकाणी  खाज होते त्या भागात लावा. लावलेला लेप  चांगल्या प्रकारे सुखल्यानंतर थंड पाण्याने धुऊन काढा. दररोज या प्रमाणे उपाय केल्यास  खाज, खरुज गजकर्ण निघून जाईल. हा  घरगुती उपाय सहज आणि ईलाज करण्यासाठी सोपा आहे. तुम्ही हा इलाज  करु शकता.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.