चाकण येथील मा उप नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक धिरज प्रकाश मुटके ह्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी कोरॉना योद्धा म्हणून प्रशासनाच्या व संस्थांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.
गरजू लोकांना अन्नधान्य,किराणा किट, सॅनिटायझर ,मास्क , प्रशासन सर्व सामान्य निर्जंतुकिकरन कक्ष ,फेस शील्ड,कपडे, नाश्ता पाणी वाटप आदी सामाजिक उपक्रम त्यांनी सर्व नगरसेवक असतील किंवा लायन्स क्लब चाकण , सार्वजनिक कामात अनेकांशी संपर्क येत आहे त्यांनी काल आपली कोरोना टेस्ट केली असता ती सौम्य लक्षणे असलेला कोविड १९
पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार चालू आहे.
“मला सौम्य प्रकारचे लक्षण असून
माझी तब्येत ठीक आहे ; खबरदारी म्हणून क्वॉरंटाइन होऊन डॉक्टर यांच्या देखरेख मध्ये उपचार घेत आहे.माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्ती व मित्र परिवाराने आपल्या टेस्ट करून घ्याव्यात सर्वांनी सोशल अंतर आणि मास्क लावून आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी ही विनंती करतो.” मा उप नगराध्यक्ष नगरसेवक धिरज प्रकाश मुटके
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम