ॲपल व फेसबुक मध्ये वाद.

टेक्निकल जगतातीमधील दोन दिग्गज कंपन्या अ‍ॅपल व  फेसबुकमधला वाद सध्या शिगेला पोहोचल्याचे  दिसत आहे. अ‍ॅपल कंपनीच्या  नव्या प्रायव्हसी पॉलिसीनंतर फेसबुक कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक हे एकमेकांविरुद्ध  आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. अ‍ॅपल कंपनीच्या अ‍ॅप स्टोअरची नवीन प्रायव्हसी पॉलिसी युजर्ससाठी चांगली असल्याचं सांगितले  जात असले तरी   फेसबुकने मात्र या पॉलिसीचा विरोध केला आहे.

अ‍ॅपल कंपनीची  नवीन प्रायव्हसी पॉलिसी वी  एकतर्फी असल्याचे फेसबुकने जाहीर केले आहे. याच गोष्टीवरून फेसबुकने ऍपल कंपनीविरुद्ध   पाऊल उचलत फेसबुकने अ‍ॅपलच्या फेसबुक पेजपा असणारे व्हेरिफिकेशन अर्थात ब्लू टिक हटवलं आहे. या  ब्लू टिक हटवण्यामागे  काय कारण आहे याबद्दल  फेसबुक ने काही जाहीर केले नाही.

फेसबुकच्या मालकीचे असणारे  इंस्टाग्राम अँप वरील अ‍ॅपलच्या पेजवर मात्र सध्यातरी ब्लू-टिक व्हेरिफिकेशन आहे. फेसबुकवर असणाऱ्या  अनेक मोठ्या कंपन्या किंवा संघटनांचे  फेसबुक पेज हे  ब्लू टिकने व्हेरिफाइड केलेले असतात.

अ‍ॅपलची प्रायव्हसी पॉलिसी  :-
अ‍ॅपल कंपनीच्या नवीन प्रायव्हसी न्यूट्रिशन लेबलअंतर्गत सर्व डेव्हलपर्सना अ‍ॅप स्टोअरवर आपले अ‍ॅप पब्लिश करण्याअगोदर आपल्याकडून कोणती माहिती घेतली जाईल याची कल्पना द्यावी लागते. जेणेकरून जर वतुम्ही अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवरती जाऊन एखादे अ‍ॅप डाउनलोड करण्याअगोदर तुम्हाला  त्या अ‍ॅपची प्रायव्हसी पॉलिसी काय आहे हे समजेल. यामध्ये डाटा कलेक्शन आणि अ‍ॅक्सेस सोबतच व वेगवेगळीप्रकारची माहिती असेल. यामुळे तुम्हाला  एखादे  अ‍ॅप तुमच्या डाटाचा वापर  कशाप्रकारे करणार आहे हे समजेल. अ‍ॅपल कंपनीचे हे न्यूट्रिशन लेबल जशी एखादी कंपनी आपल्या  फूड पॅकेटवर द न्यूट्रिशन लेबल देते त्याप्रमाणेच आहे.  नवीन पॉलिसी अ‍ॅपलच्या इन-हाउस अ‍ॅप्सला सुध्दा लागू होईल.

फेसबुकचा विरोध का आहे? :-
अ‍ॅपल कंपनीच्या  नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत फेसबुकचीचे मालकी हक्काचे असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने टीका केली आहे. अ‍ॅपलची नवीन पॉलिसी ही  एकतर्फी असल्याचा आरोप व्हॉट्सअ‍ॅपने  देखील केला आहे. थर्ड पार्टी अ‍ॅपसाठी न्यूट्रिशन लेबलची सक्ती आहे. परंगू जे अ‍ॅप्स अगोदरच  आयफोनमध्ये इंस्टॉल केलेले असतील त्याचे  काय अशी विचारणा केली.  अ‍ॅपलचं आयमेसेज हे अ‍ॅप  अ‍ॅप स्टोअरमध्ये उपलब्ध नाहीये, तर मग त्यावर न्यूट्रिशन लेबल कसे काय लागणार असा सवाल देखील व्हॉटसअप ने  विचारला आहे. त्यावर आयमेसेजचं न्यूट्रिशन लेबल अ‍ॅपलच्या वेबसाइटवर दिसेल  असे  अ‍ॅपलकडून सांगण्यात आले  आहे. तर नवीन नियम हा  अ‍ॅपलच्याही सर्व अ‍ॅप्सला  लागू असेल असे अ‍ॅपलने स्पष्ट केले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.