बायकोने भाजपला राजीनामा दिला म्हणून नवऱ्याने दिली घटस्फोट देण्याची धमकी

आपल्या पत्नीने भारतीय जनता पार्टीचां राजीनामा दिला म्हणून खासदार असणाऱ्या  पतीने चक्क राजीनामा देण्याची धमकी दिली आहे.  पती पत्नीच्या वादाच्या अनेक घटना आपल्याला पाहायला मिळाल्या असतील. कधी पत्नी आपल्या पतीला मारहाण करते, कधी पती आपल्या पतीला मारहाण करतो, अशा घटना घडत असतात. कधी एकमेकांवर संशय घेतल्याने पती पत्नी वाद पटत असतो .

मात्र राजकारणातून पती व पत्नी वाद झाल्याचे खूप कमी वेळा पहिले असेल. त्यातही एकदम घटस्फोट देण्याची धमकी. ही गोष्ट घडली आहे, पच्चिम बंगाल मध्ये.

सध्या पश्चिम बंगालमध्ये पक्षांतराच्या घडामोडी घडत  आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यापासून पक्षातराला सुरूवात झाली आहे.  आज भारतिय जनता पार्टीचे खासदार सौमित्र खान यांच्या अर्धांगिनी सुजाता मोंडल खान यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सुजाता मोंडल खान खान यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस या पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

आपल्या पत्नीने म्हणेच सुजाता मोंडल यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची बातमी मिळाल्यानंतर नाराज झालेले खासदार सौमित्र खान यांनी सुजाता मोंडल खान यांना घटस्फोट देण्याची धमकी दिली. खासदार सौमित्र खान हे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष आहेत. सौमित्र  खान पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हणाले, की ”मी तिला संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. माझी तिला एक विनंती आहे की, माझे आडनाव नावासमोर लावू नकोस. तुझ्या नावासमोरील खान हे आडनाव काढून टाक. ते तुझे अधिकार  समाप्त करतील . त्यांनी तुला तुझ्यावर हल्ला करण्याची धमकी दिली होती.

तुझ्या  आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना तुझी नोकरी ममता बॅनर्जी यांनी हिसकावून घेतली होती. मी माझे वचन पाळले होते. मी तुला आधार दिला. तुला पुन्हा उभे केले. तुझ्या खात्यावर तुझा निम्मा पगार  जमा केला. कारण तुला कोणाला पैसे मागण्याची वेळ येऊ नये म्हणून आणि  तुला ज्या लोकांनी भूतकाळामध्ये  दुःख दिलं, तुला त्रास दिला त्या लोकांशी  तू हात मिळवला आहेस,” असे बोलत असताना खासदार  खान यांचे डोळे भरून आले.

“भारतीय जनता पार्टीने  मला ओळख मिळवून दिली. भारतीय जनता पार्टीशिवाय मी कुणीच नाही. हे देखील खरे  आहे की तू माझा निवडणुकीत प्रचार केला, पण मी भारतीय जनता पार्टीच्या  नावावर  निवडणूक जिंकलो आहे. प्रत्येक घरात कौटुंबिक वाद  होत असतात परंतु महत्त्वकांक्षा जपण्यासाठी तू कुटुंबाला बाजूला ठेऊन राजकारण निवडले आङे. तू अडकली आहेस, तुझी खूप मोठी चूक झाली आहे,” असे म्हणत आपण घटस्फोट देत असल्याचे त्यांनी सांगितले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.