नातेपुते, अकलूज, वैराग, महाळुंग-श्रीपुर ग्रामपंचायत निवडणुकीला स्थगिती.

महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते, अकलूज, वैराग, महाळुंग-श्रीपुर या चार ग्रामपंचायत निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. स्थगिती बाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील स्थगिती दिली गेलेल्या ग्रामपंचायती पैकी तीन ग्रामपंचायती या माळशिरस तालुक्यातील आहेत. तर बार्शी तालुक्यातील वैराग ही ग्रामपंचायत आहे. या चारही ग्रामपंचायतींना स्थगिती देण्याचे कारण म्हणजे या ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर परिषद व नगर पंचायत मध्ये होणार आहे.

‌बार्शी तालुक्यातील वैराग ग्रामपंचायत बरखास्त करून त्या ठिकाणी नगरपंचायत करण्यासाठी नगर विकास विभागाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गेला आहे. या चारही ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय व राज्य सरकार यांच्याकडून नगर परिषद व नगर पंचायत स्थापन करण्यासाठी प्रक्रिया चालू असतानाच राज्य निवडणूक आयोगाने या चारही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आज मिळालेल्या पत्रानुसार पुढील तीन महिने निवडणूक स्थगित असणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.