शिवसेनेच्या प्रवेशाबाबत अजून काही ठरलेलं नाही; उर्मिला मातोंडकर

बॉलीवूडची सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. शिवसेनेने विधानसभेच्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारसही केल्याचे समजते. मात्र उर्मिला मातोंडकर यांनी अजून तरी शिवसेनेत प्रवेश करणार आहे की नाही याविषयी निश्चित झाले नाही. असं म्हटलं असल्याने, उर्मिला मातोंडकर यांच्या पक्षप्रवेशा बाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करतील! अशा बातम्या सकाळी झळकल्या होत्या. मात्र आज मी पक्ष प्रवेश करणार नसल्याची माहिती स्वतः उर्मिला मातोंडकर यांनी एका माध्यमाला दिली असल्याची माहिती आहे. उर्मिला मातोंडकर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत माध्यमांनी संजय राऊत यांना विचारले असता, संजय राऊत म्हणाले, उर्मिला मातोंडकर ह्या शिवसैनिकच आहेत. आज नाही तर, उद्या त्या पक्ष प्रवेश करतीलच. उर्मिला मातोंडकर शिवसेनेत आल्याने शिवसेनेची महिला आघाडी बळकट होण्यास नक्कीच मदत होईल. असंही संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

उर्मिला मातोंडकर यांनी 2019ची लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. अवघ्या सहा महिन्यानंतर त्यांनी काँग्रेसचा राजीनामाही दिला होता.

अभिनेत्री कंगना राणावत हीने मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे,संजय राऊत यांच्यावरही टीका केली होती. या टीकेला उर्मिला मातोंडकर यांनी प्रत्युत्तर दिले होते. आणि म्हणूनच उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून आमदारकी मिळत असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा

विधानसभेच्या 12 जागा राज्यपाल यांच्या नियुक्तीनुसार होणार असून, महाविकास आघाडी सरकारने बारा जणांची यादी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे दिली आहे. मात्र अद्याप या यादीवर भगतसिंग कोशारी यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.

WhatsApp Group