आळंदीकरांचा पाणी प्रश्न सोडवणे हे माझेच कर्तव्य : सागर बोरूंदीया

नुकतीच आळंदी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी सागर बोरुंदिया यांची निवड झाली आहे. त्यांनी कामाचा धडाका लावण्यास सुरुवात केली आहे.  नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया यांनी आळंदी शहरासाठी महत्वाचां असलेल्या  पाणीपुरवठा  योजनेमध्ये स्वतः लक्ष घालून हा प्रकल्प लवकरात लवकर  मार्गी लावण्यासाठी यशस्वी सुरुवात केली. उपनगराध्यक्ष सागर बोरूंदीया  वॉटर सप्लायर या परिसरातील स्वच्छता करण्याचा निश्चय करत   तेथील परिसर स्वच्छ करून घेतला आईम

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत भामा आसखेड धरणामधून पुणे महानगरपालिकेला जाणाऱ्या जलवाहिनीमधून कुरूळी येथील जॅकवेलमधून टॅपिंगद्वारे आळंदी पाणी योजनेला पाणी देण्यासाठी राज्य शासनाने  साडेपाच कोटी रूपयांचा भरीव  निधी मंजूर केला होता.

आळंदी नगरपरिषदेच्या २८ एप्रिल रोजी ,झालेल्या बैठकीमध्ये  स्थायी समितीच्या बैठकीत  या  कामासाठी मंजूरी देण्यात आली. आळंदी नगरपरिषदेने कॉन्ट्रॅक्टर ला कामाला सुरुवात कटण्याचे आदेश  दिल्यानंतर  कामला सुरूवात करण्यात आली  होती.

मात्र प्रत्यक्षामध्ये  काम सुरू करन्यासाठी अनेक अडचणी समोर  आल्या. त्यामुळे नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर व आळंदीचे  नवनियुक्त उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया या दोघांनी संबंधीत कंत्राटदाराला  आळंदी जलशुद्धीकरण केंद्रापासून काम सुरू करण्यास सांगितले, त्या कामाची सुरूवात आज शनिवार दि. २८ नोव्हेंबर रोजी करण्यात  आली. यावेळी इतर मान्यवर देखील उपस्थित होते.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/KqfAHebyQP06XCNLEjowkG

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.