महाराष्ट्र सरकारने नववी ते बारावी विद्यार्थ्यांच्या 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाने आदेश दिले असले तरी,आदेश सक्ती करण्यात आलेला नसून स्थानिक प्रशासनावर हा निर्णय सोपवण्यात आला आहे.
23 नोव्हेंबरला शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने काही गाईडलाईन्स सांगितल्या आहेत. त्यामध्ये सर्व शिक्षकांच्या कोरोणा चाचण्या करणं बंधनकारक असणार आहे. शासनाने सांगितलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे, हाराष्ट्रातील सर्व शिक्षकांच्या कोरोणा चाचण्या केल्या जातील,असं आरोग्य विभागाला यापूर्वीच सांगितलं होतं.
आरोग्य विभागाने सांगितल्याप्रमाणे,गेल्या तीन दिवसांत माळशिरस तालुक्यामधील 730 शिक्षकांच्या कोरोणा चाचण्या करण्यात आल्या. या 730 शिक्षकांपैकी तालुक्यातील 14 शिक्षक कोरोणा पॉझिटिव आढळले आहेत,अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी रामचंद्र मोहिते यांनी दिली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेला 14 शिक्षकांना कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आलेलं आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम