अलीकडे एकमेकांपासून लांब गेलेले लालकृष्ण अडवाणी यांनी नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
भाजपचे ज्येष्ठ नेते, लोहपुरुष अशी ओळख असणारे , भाजपाच्या यशापाठीमागील महत्वाचा चेहरा असणारे लालकृष्ण अडवाणी यांच्या आज वयाची 93 वर्ष पूर्ण होत आहेत. आजपर्यंत अनेक चढ उतार पाहत अडवाणी इथपर्यंत पोहोचले आहेत.
लालकृष्ण अडवाणी यांच्या वाढदिसानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गृहराज्यमंत्री अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी देखील अडवाणी यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. अलीकडे नरेंद्र मोदी व अडवाणी यांचे फारसे सुत जुळत नाही. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून दोघांचे जुळत नाही. कारण दोघेही पंतप्रधान पदाचे दावेदार समजले जात होते.
अडवाणी यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी चळवळीचे नेतृत्व केले. देशभर रथयात्रा काढली होती. भारतीय जनता पक्षाचे संस्थापक सदस्य असणाऱ्या अडवाणी यांनी भारतीय जनता पार्टीला देशात आपले बस्तान बसविण्यात फार मोठा मोलाचा वाटा अडवाणी यांचा आहे. मात्र त्याच अडवाणी यांना अलीकडच्या काळात राजकीय सण्यास घ्यावा लागला.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम