Rohit Sharma Sack: रोहितला कर्णधार पदावरून हटवलं, संघातूनही मिळणार डच्चू; असा आहे BCCI चा रोड मॅप..
Rohit Sharma Sack : 19 ऑक्टोबर पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया (india vs australia odi series) यांच्यामध्ये तीन एकदिवसीय सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली जाणार असून, यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेल्या संघात बीसीसीआयने कमालीचे बदल केले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढून टाकण्यात आले आहे.
बीसीसीआयने ( BCCI) एकदिवसीय मालिकेसाठी (odi series)आपल्या संघाची घोषणा केली आहे. यामध्ये रोहित शर्माची (rohit Sharma) कर्णधार पदावरून हाकलपट्टी करण्यात आली आहे मात्र त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. रोहित शर्मा बरोबर विराट कोहलीला (virat kohli) देखील पुन्हा संधी मिळाली आहे. बीसीसीआयच्या निर्णयामुळे आता 2027 साली होणारा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहणार आहे.
2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाला अजूनही दीड वर्ष शिल्लक आहे. त्यापूर्वीच त्याची कर्णधार पदावरून हकलपट्टी करण्यात आली आहे. आता जर रोहित शर्मा फलंदाज म्हणून आपल्या खेळात सातत्य दाखवू शकला नाही, तर त्याला संघाच्या बाहेर केलं जाऊ शकतं. हा संदेश अप्रत्यक्षरीत्या त्याला देण्यात आला आहे.
भारतीय संघात कायम रहायचे असेल, तर रोहित शर्माला दमदार कामगिरी करावी लागणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा चांगली कामगिरी करत असला तरी त्याच्याकडे सातत्याचा अभाव आहे. याशिवाय मोठी खेळी देखील करण्यात तो दीर्घ काळापासून अपयशी ठरला आहे. रोहित शर्माचा पर्याय म्हणून भारताच्या संघात अभिषेक शर्माची (abhishek Sharma) देखील एन्ट्री झाली आहे.
रोहित शर्मा ऐवजी शुभमन गिलला (shubman gill) एकदिवसीय संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. तर उपकर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची (shreyas iyer) निवड करण्यात आली आहे. याशिवाय नितीश कुमार रेड्डीला (nitish kumar reddy) देखील एकदिवसीय संघात संधी मिळाली आहे. संजू सॅमसनला निवड समितीने पुन्हा एकदा डावलले आहे. पर्यायी दुसरा विकेटकीपर फलंदाज म्हणून ध्रुव जूरेलला संधी देण्यात आली आहे.
असा आहे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय एकदिवसीय संघ;
शुभमन गिल कर्णधार, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार) अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टिरक्षक) नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक) यशस्वी जैस्वाल
हे देखील वाचा iPhone: iPhone खरंच स्मार्टफोनचा राजा आहे? जाणून घ्या कॅमेऱ्यासाठी सगळ्यात बेस्ट फोन..
Haval H 9 SUV: अभिषेकला मिळालेली गाडी आहे जगात भारी; गाडीचे फिचर्स जाणून व्हाल चकित..
TET Exam : शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात महत्वाचा निर्णय; विद्यार्थ्यांना मिळणार..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम