Peek Pahani : शेतकऱ्याच्या मदतीला सरकार धावलं; पिक पाहणी विषयी सरकारचा मोठा निर्णय..
Peek Pahani : राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने (disaster management) शेतकरी (maharashtra farmer) अक्षरशः होरपळून निघाला आहे. एकीकडे शेतकरी मदतीची विनवणी करत असताना दुसरीकडे सरकार मात्र आपला हात आखडता घेताना दिसून येत आहे. हेक्टरी 50 हजार पर्यंतची मागणी केली जात असताना, सरकारने मात्र केवळ हेक्टरी साडेआठ हजार रुपयांपर्यंतची मदत करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे त्यात दोन हेक्टर पर्यंतची मर्यादाही ठेवण्यात आली आहे.
सरकारच्या या निर्णया विरोधात शेतकऱ्याने प्रचंड संताप व्यक्त केला. अतिवृष्टीत शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. पिकाबरोबर त्याची शेती देखील वाहून गेली आहे. शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झालं असताना, सरकार केवळ शेतकऱ्यांचे थट्टा करत असल्याचं बोललं जात आहे. या संकटात आणखी भर म्हणजे, ऑनलाईन पीक पाहणी करताना सर्वरचा खूप मोठा प्रॉब्लेम होताना दिसून येत होता. आता मात्र या अडचणीतून सरकारने मार्ग काढला असून, ऑनलाईन ऐवजी ऑफलाइन पद्धतीने पीक पाहणी (peek pahani ) करण्याचा निर्णय घेतला आहे.
31 ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पिक पाहणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आपल्या x अकाउंट वरून या संदर्भातली माहिती दिली असून,आता यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 1 ते 31 ऑक्टोबर पर्यंत शंभर टक्के पीक पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिऱ्यांना देण्यात आले आहेत.
आपल्या एक्स अकाउंट वरून यासंदर्भातली माहिती देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्य अपत्कालीन परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे शंभर टक्के पीक पाहणी होणे आवश्यक आहे. मी या संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून, आपल्या यंत्रणेमार्फत 31ऑक्टोबर पर्यंत सर्व पीक पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरी 100% पीक पाहणी होणार असल्याचं म्हटलं असलं तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळणारी मदत मात्र तुटपुंजी आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत पिक पाहणी होणार, आणि त्यानंतर नेमकी कधीपर्यंत भरपाई मिळणार, हा मोठा प्रश्न आहे.
याशिवाय हेक्टरी साडेआठ हजार रुपयाची मदत सरकारने जाहीर केली आहे. त्यात मर्यादा देखील दोन हेक्टर पर्यंत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडाला केवळ पाने पुसली जाणार आहेत, हेही यातून स्पष्ट झाले आहे.
हे देखील वाचा
Haval H 9 SUV: अभिषेकला मिळालेली गाडी आहे जगात भारी; गाडीचे फिचर्स जाणून व्हाल चकित..
100rs coin RSS: भारतीय चलनावर RSS ची एन्टी; नरेंद्र मोदींनी लाँच केले 100 रुपयांचे हे नाणे..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम