CT 2025: दुखापतीमुळे शुभमन गिल आऊट? ऋषभ पंत खेळणार उर्वरित सामने, रोहितही न्युझीलंड विरुद्ध मुकणार..
CT 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (icc champions trophy 2025) स्पर्धेचे अंतिम चार संघ आता जवळपास निश्चित झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ अद्याप सेमीफायनमध्ये अधिकृतरित्या पोहोचला नसला तरी आज इंग्लंडविरुद्ध सामन्यात पोहचेल हे निश्चित आहे. अगदी पराभव झाला तरी देखील आफ्रिका सेमीफायनलमध्ये (semifinal) पोहचणार आहे. एकीकडे सेमीफायनलचे संघ निश्चित झाले असताना दुसरीकडे मात्र भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे.
सरावादरम्यान रोहित शर्माच्या (rohit sharma) पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे रविवारी 2 तारखेला होणाऱ्या न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा खेळताना दिसणार नसल्याची माहिती समोर आली आहे. रोहित शर्माची दुखापत गंभीर नसली तरी टीम इंडिया कोणतीही रिस्क घेणार नाही. अ गटातून भारत यापूर्वीच सेमीफायनलमध्ये पोहचला आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या न खेळण्याने निकालावर कोणताही परिनामा पडणार नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी टीम इंडियामध्ये (team india) अनेक समस्या होत्या. मात्र भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. भारतीय संघाने या स्पर्धेमध्ये सुरुवातीचे दोन्हीं सामने जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. जरी असं असलं अद्याप भारतासमोर तगडं आव्हान उभं राहिलं नव्हतं. न्युझीलंड संघाच्या रुपात भारतासमोर एक तगडं आव्हान उभे राहिले असून, या सामन्याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
रविवारी होणाऱ्या सामन्यात जो संघ जिंकेल तो संघ अ गटातून टॉप करणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचा फारसा फरक पडणार नसला तरी सेमीफायनलमध्ये कोणताही संघ पराभव घेऊन जाणं पसंत करणार नाही. त्यामुळे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हा सामना जिंकून अपराजित म्हणून सेमीफायनमध्ये जाण्याच्या इराद्यानेच भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
रोहित शर्माच्या जागेवर ऋषभ पंतला संधी मिळणार असून, ऋषभ पंत (rishabh pant) गिल सोबत ओपन करण्याची शक्यता आहे. न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल (Shubman Gill) देखील खेळणार नसल्याची माहिती होती. शुभमन गिल आजार पडल्याने रोहित शर्माबरोबर तो देखील मुकणार होता. मात्र आता गिल पूणपणे बरा असून न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार असल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे चाहत्यांना धक्का देणारी बातमी आता सुखद धक्का देऊन गेली आहे.
असा असेल भारतीय संघ; शुभमन गिल, ऋषभ पंत, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, वरून रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षित राणा
हे देखील वाचा Swargate ST Stand: नराधम दत्ता गाडेने बलात्कारापूर्वी देखील केलेत हे काळे धंदे; अशी आहे त्याच्या घरची परिस्थिती..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम