AUS vs AFG: अफगाणिस्तान या तीन कारणामुळे पोहचणार सेमीफायनलमध्ये; मग ऑस्ट्रेलियाचे काय? वाचा..
AUS vs AFG: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC champions trophy2025) स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. क्रिकेट चाहत्यांना आजच अधिकृतरित्या सेमीफायनलचे (semifinal) चार संघ पाहिला मिळू शकतात. आज ऑस्ट्रेलिया (Australia) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण सामना खेळवण्यात येणार आहे. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल, तो थेट सेमी फायनलमध्ये पोहोचणार आहे.
ऑस्ट्रेलियासाठी अफगाणिस्तान संघाचे आव्हान सोपं नसणार आहे. होय आज अफगाणिस्तान संघ सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची दाट शक्यता आहे. क्रिकेट चाहत्यांना अफगाणिस्तान संघापेक्षा ऑस्ट्रेलियाचा संघ तगादा वाटत असला तरी ऑस्ट्रेलिया संघाचा गोलंदाजी मारा फारच सुमार आहे. जाणून घेऊया अफगाणिस्तान फायनलमध्ये पोहोचण्याची तीन प्रमुख कारणे..
गेल्या काही वर्षात अफगाणिस्तान संघाचा खेळ कमालीचा उंचावला आहे. अफगाणिस्तान संघाने अनेक बड्या संघाला आयसीसी स्पर्धेत धूळ चारण्याची किमया केली आहे. या स्पर्धेत देखील अफगाणिस्तान संघाने इंग्लंड संघाला चॅम्पियन स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळायला लावला आहे. आणि आज देखील ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करून सेमीफायनलमध्ये धडक मारण्याच्या इराद्यानेच अफगाणिस्तान संघ मैदानात उतरणार आहे.
गोलंदाजी चिंतेचा विषय
ऑस्ट्रेलिया संघासाठी गोलंदाजी अटॅक चिंतेचा विषय आहे. हेजलवूड, स्टार्क, कमिन्स यासारखे प्रमुख खेळाडू संघाचा भाग नाहीत. या चौघांची उणीव इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात स्पष्ट दिसून आली. खेळपट्टी जरी फलंदाजांना साथ देणारी असली तरी ऑस्ट्रेलियाचा एकही गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांना बाद करू शकेल असं वाटत नव्हतं.
ऑस्ट्रेलियाप्रमाणेच इंग्लंडच्या संघाची गोलंदाजी असल्याने, ऑस्ट्रेलियाला या सामन्यात विजय मिळवता आला. दुसरीकडे अफगाणिस्तान संघाचे फलंदाज दमदार फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे दोन्ही संघाच्या गोलंदाजीची तुलना करायची झाल्यास अफगाणिस्तान संघाचा गोलंदाज मारा अधिक प्रभावी आहे. 2023 मध्ये झालेल्या विश्वचषक सामन्यात देखील अफगाणिस्तान संघाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचे सुरुवातीचे प्रमुख फलंदाज बाद केले होते. मात्र मॅक्सवेलच्या धुवांधार खेळामुळे अफगाणिस्तानला थोडक्यात पराभवाचा सामना करावा लागला.
फिरकीच्या जाळ्यात अडकणार
एकीकडे अफगाणिस्तान संघाकडे दमदार जलदगती गोलंदाज आहेत. तर दुसरीकडे दमदार फिरकी मारा देखील आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचे फलंदाज अफगाणिस्तान संघाच्या फिरकीपट्टूंचा कसा सामना करणार, हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजांपुढे अफगाणिस्तान संघाच्या स्पिन गोलंदाजांचे आव्हान निर्माण होण्याचे कारण म्हणजे, ऑस्ट्रेलिया संघाचा मिडल ऑर्डर नवखा आहे.
..म्हणून फलंदाजी कोलमडण्याची दाट शक्यता
अफगाणिस्तान संघाकडे ऑस्ट्रेलिया संघाच्या तुलनेत फिरकी आणि जलदगती गोलंदाजी दमदार आहे. त्याचबरोबर फलंदाजी देखील उत्तम आहे. त्यामुळे अफगाणिस्तान संघाने जर 320 च्या पुढे धावसंख्या उभारली तर ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव झाल्यास आश्चर्य वाटू नये.
पराभव झाला तरी ऑस्ट्रेलिया पोहचणार सेमीफायनलमध्ये…?
जर ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव झाला तर या स्पर्धेतील त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात येणार आहे. पराभवानंतर ऑस्ट्रेलिया या स्पर्धेतून अधिकृतरीत्या बाहेर जाणार नसला तरी, सेमीफायनलमध्ये पोहचण्याचे त्यांचे समीकरण दक्षिण आफ्रिकेवर अवलंबून असणार आहे.
मात्र इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्यात जरी दक्षिण आफ्रिका पराभूत झाली तरी देखील दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये पोहचू शकते. ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाला मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात जर दक्षिण आफ्रिकेचे रनरेट ऑस्ट्रेलियापेक्षा कमी झाले, तरच ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये पोहचण्याची संधी मिळणार आहे.
हे देखील वाचा Swargate ST Stand: नराधम दत्ता गाडेने बलात्कारापूर्वी देखील केलेत काळे धंदे; अशी आहे त्याच्या घरची परिस्थिती..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम