Redmi Note : 2024 मधील सर्वोत्तम स्मार्टफोन बाजारात दाखल; वॉटरफ्रुपसह अनेक दमदार फीचर्स, कॅमेरा तर..

0

Redmi Note : अलीकडच्या काळात स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे. स्मार्टफोन केवळ चैनीची वस्तू राहिली नसून, आता स्मार्टफोनच्या माध्यमातून लाखो रुपये देखील अनेक जण कमावतात. साहजिकच त्यासाठी उत्तम कॅमेरा, उत्तम स्टोरेज, दमदार प्रोसेसर, अशा अनेक गोष्टींचा विचार करूनच ग्राहक स्मार्टफोनची खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतात.

अनेकांना दमदार आणि दर्जेदार आणि कोणते उत्पादन खरेदी करायचे याविषयी योग्यवेळी पुरेशी माहिती मिळत नाही. साहजिकच त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी 2024 मधील बेस्ट स्मार्टफोन घेऊन आलो आहोत. ज्याचे फीचर्स जाणून तुम्ही देखील प्रेमात पडाल.

2024 मधील सर्वात दमदार स्मार्टफोन लाँच झाला असून, Redmi Note 14 आणि Note 14 Pro त्याचबरोबर Note 14 Pro+ असे हे स्मार्टफोन आहेत. सगळ्यांना आकर्षित करणारी बाब म्हणजे, हे स्मार्टफोन वॉटरफ्रुप आहेत. तुम्ही अगदी पाण्यामध्ये देखील हा स्मार्टफोन वापरू शकता.

Redmi Note 14 सिरीजचे हे सगळे स्मार्टफोन Android 14 वर आधारित आहेत. या सिरिजचे सर्व कॅमेरा दमदार देण्यात आले आहेत. सोबतच Al फीचर्स देखील देण्यात आले आहे. वॉटरप्रुफ बरोबर हा स्मार्टफोन डस्ट फ्रुप देखील आहे. याबरोबरच या सिरिजच्या सर्व स्मार्टफोनची स्क्रीन पाण्यात देखील वापरता येणार आहे. तुम्ही पाहिले असेल इतर स्मार्टफोन्सची स्क्रीन ओली असली तरी ते चालतं नाहीत.

Al फीचर्स आणि कॅमेरा

Redmi Note 14 Pro+ या स्मार्टफोनमध्ये 21 हून अधिक AI फीचर्स देण्यात आली आहेत. या स्मार्टफोनचा कॅमेरा दमदार आहे. या स्मार्टफोनला देण्यात आलेल्या रियर कॅमेरा सेटअपला तीन कॅमेरा देण्यात आले आहेत. जे सर्वोत्तम आहेत.

मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सल्सचा देण्यात आला आहे. जो OIS कॅमेरा असणार आहे. ज्याची लेन्स Sony LYT-600 देण्यात आली आहे. सोबतच 12 मेगापिक्सल असणारा दुसरा एक कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी त्याचबरोबर व्हिडिओ कॉल करण्यासाठी 16 मेगापिक्सेल असणारा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

प्रोसेसर

या स्मार्टफोनला Snapdragon 7s Gen3 असा प्रोसेसर देण्यात आला आहे. Note 14 त्याचबरोबर Note 14 Pro या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimension 7025 Ultra व MediaTek Dimension 7300 Ultra असा प्रोसेसर देण्यात आला आहे.

बॅटरी

धावपळीच्या या युगात स्मार्टफोनला बॅटरी बॅकअप उत्तम असणे देखील महत्वाचे आहे. बॅटरी बॅकअपची पूर्तता तुम्हाला या फोनमध्ये मिळून जाते. या फोनमध्ये तुम्हाला 5,110mAh बॅटरी देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे बॅटरीला 45W चा चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

किंमत

Redmi Note 14 Pro+ या स्मार्टफोनची किंमत 30 हजार 999 रुपये आहे. ज्याचे रॅम 8GB आणि स्टोरेज 128 आहे. त्याचबरोबर Redmi Note 14 Pro या स्मार्टफोनची किंमत 24 हजार 999 रुपये आहे. या स्मार्टफोनचे देखील रॅम 8GB आणि स्टोरेज 128 GB देण्यात आले आहे.

हे देखील वाचा Ladki Bahin Yojana: आता लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या पाच अटींची करावी लागणार पूर्तता..

Pushpa 2 The Rule : गंडलाय तरीही का करतोय बक्कळ कमाई; काय असेल pushpa 3 मध्ये..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.