Ladki Bahin Yojana: आता ‘लाडकी बहिण योजनेचा’ लाभ घ्यायचा असेल तर या पाच अटींची करावी लागणार पूर्तता..
Ladki Bahin Yojana: 2024 विधानसभा निवडणूक (vidhansabha election) तोंडावर असताना महायुतीने (mahayuti) लाडकी बहीण योजनेची (ladki bahin yojna) घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना प्रतिमहा दीड हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. महिलांना आकर्षित करण्यासाठी थेट बँक खात्यावर पैसे देखील टाकण्यात आले. मात्र आता या योजनेची पडताळणी केली जाणार असून, अनेक महिला या योजनेतून आता वगळल्या जाणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी माजी महिला आणि बाकविकास मंत्री अदिती तटकरे (aditi tatkare) म्हणाल्या, योजना सुरू राहणार आहे. कोणाच्याही अर्जाची छाननी होणार नाही. एखाद्या तालुक्यातून तक्रार आल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. मात्र आता अर्जाची पडताळणी सुरू करण्यात आली असून, राज्यातील अनेक महिला या योजनेला मुकणार हे स्पष्ट झाले आहे.
महायुतीचे सरकार आल्यानंतर आता डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणीचा पुढील हप्ता देण्यात येणार आहे. यासाठी आता काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. यापूर्वी उत्पन्नाच्या दाखल्याला पर्याय म्हणून रेशन कार्डची झेरॉक्स चालत होती. आता मात्र या योजनेच्या लाभ घ्यायचा असेल, तर उत्पन्नाचा दाखला अनिवार्य असणार आहे.
आतापर्यंत या योजनेचा लाभ दोन कोटी ३४ लाख महिलांना घेतला आहे. मात्र आता निकषांची पडताळणी केली जाणार असल्याने अनेक महिला या योजनेच्या लाभापासून मुकणार आहेत.
उत्पन्नाच्या दाखल्याबरोबर, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. एकाच कुटुंबातील केवळ 2 महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
पाच एकर किंवा त्यापेक्षा पेक्षा कमी जमीन असणे आवश्यक आहे. चारचाकी वाहन नावावर असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. एकच महिला जर 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल, तर तिला या योजनेमधून वगळण्यात येणार आहे. वरील सर्व निकषांची पडताळणी करूनच महिलांना डिसेंबरमध्ये हप्ता दिला जाणार असल्याचं बोललं जात आहे.
इतर कोणत्याही सरकारी योजनेचे एक कोटींपर्यंत देखील लाभार्थी नाहीत. मात्र लाडकी बहिण योजनेचे तब्बल अडीच कोटीहून अधिक लाभार्थी आहेत. एका प्रगतिशील राज्यामध्ये अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारी इतकी मोठी संख्या असू शकत नाही. असं सांगण्यात येत आहे, त्यामुळे या योजनेची पडताळणी केली जाणार आहे.
लाभार्थी महिलांना 1एप्रिल पासून लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता देण्यात येणार असल्याची देखील माहिती आहे. तोपर्यंत महिलांना 1,500 हजारांचाच हप्ता दिला जाणार आहे. अडीच कोटी लाभार्थी महिलांना जर 2100 रुपयांचा दरमहा हप्ता द्यायचा, असेल तर दरवर्षी 56 हजार कोटींचा निधी लागणार आहे. Lराज्याचे एकूण उत्पन्न आणि खर्चाचा हिशेब या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा झाल्यास, केवळ एकाच योजनेसाठी इतकी मोठी रक्कम खर्च करणं शक्य नसल्याचं, वित्त मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना सांगितले.
हे देखील वाचा Pushpa 2 The Rule : गंडलाय तरीही का करतोय बक्कळ कमाई; काय असेल pushpa 3 मध्ये..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम