Pushpa 2 The Rule : गंडलाय तरीही का करतोय बक्कळ कमाई; काय असेल pushpa 3 मध्ये..
Pushpa 2 The Rule : पुष्पा या चित्रपटाला घवघवीत यश मिळाल्यानंतर, चाहत्यांना पुष्पा2 या चित्रपटाचे वेध लागले होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर पुष्पा 2 चाहत्यांच्या भेटीला आला. अपेक्षाप्रमाणे पुष्पा2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कल्ला केला असला तरी पुष्पा टू हा चित्रपट गंडला आहे. हे देखील वास्तव नाकारता येणार नाही.
अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika mandana) यांच्या मुख्य भूमिका असणारा पुष्पा (pushpa) हा चित्रपट पहिल्यांदा चाहत्यांच्या भेटीला आला तो 2021 मध्ये. या चित्रपटाने अक्षरशः चाहत्यांना वेड लावलं. चाहत्यांनी हा चित्रपट डोक्यावर घेतल्यानंतर, दिग्दर्शक यांच्यावर पुष्पा 2 या चित्रपटाची देखील अतिरिक्त जबाबदारी वाढली. प्रेक्षकांनाही हा चित्रपट पहिल्यासारखा दर्जेदार आणि सर्वोत्तम असेल हीपेक्षा होती. मात्र ‘पुष्पा 2’ या चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केल्याचं पाहायला मिळत आहे.
बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सर्व रेकॉर्ड तोडत असला तरी स्टोरी आणि स्क्रीनप्ले म्हणावा तसा जुळून आला नाही. आणि म्हणूनच सहाव्या दिवशी प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. पुष्पा 2 या चित्रपटाची स्टोरी आणि स्क्रिन प्ले हा पुष्पा चित्रपटापेक्षा साधारण वाटतो. साहजिकच पहिल्या चित्रपटाच्या घवघवीत यशामुळे या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. दीर्घ प्रतीक्षेनंतर हा चित्रपट भेटीला येत असल्याने प्रेक्षक गर्दी करत आहेत. सहाजिकच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करतोय. मात्र पुढे हळूहळू प्रेक्षक या चित्रपटाकडे पाठ फिरवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दिग्दर्शक सुकुमार यांनी ‘पुष्पा 3’ देखील प्रेक्षकांच्या भेटला येणार असल्याचे याच चित्रपटातून सांगून टाकले आहे. रश्मिका मंदाना गरोदर असून, पुढे हेच मुल पुष्पा 3 चित्रपटाचा हिरो असण्याची शक्यता आहे. कारण अल्लू अर्जुन पुष्पा 3 या चित्रपटात दिसणार नसल्याच्या चर्चा आहेत. चित्रपटाच्या शेवटी एकत्र आलेल्या संपूर्ण कुटुंबाला बॉम्बने उडविण्यात आले आहे. आता या बॉम्बस्पोटामध्ये रश्मिका मंदाना पोटामध्ये असणारे मुल वाचलं जाणार असल्याचं बोललं जात असून, हे मुल विजय देवरकोंडा असल्याचं देखील बोललं जात आहे.
इतिहासात आत्तापर्यंत पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत ‘पुष्पा 2’ या चित्रपटाने आपले नाव कोरले आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 62.60 कोटींची कमाई केली होती. याबरोबरच सर्वात जलद 500 कोटींचा टप्पा पूर्ण करण्याच्या यादीमध्ये देखील पुष्पा 2 या चित्रपटाने आपले स्थान निर्माण केलं आहे. आतापर्यंत सहा दिवसांत या चित्रपटाने 646.96 कोटींची कमाई केली आहे. यापूर्वी पहिल्या दिवशी सर्वाधिक ओपनिंग करणाऱ्या चित्रपटामध्ये बाहुबली-2 चित्रपटाचे नाव होते.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम