अनिल सावंत परिवाराकडून मंगळवेढा स्वच्छता मोहीम; चार भक्तीस्थळे आणि परिसरची केली स्वच्छ्ता
अनंत चतुर्थी निमित्त काल 17 तारखेला मंगळवेढा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत चार भक्तीस्थळे आणि आसपासचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यामध्ये काशी विश्वेश्वर मंदिर, चोखामेळा समाधी चौक, दामाजी मदिर चौक स्वच्छ्ता आणि वृक्षारोपण, शिवलिंग मंदिरचा समावेश आहे. ही मोहीम अनिल सावंत तसेच भैरवनाथ उद्योग समूहाकडून राबवण्यात आली.
खूप प्राचीन आणि ऐतिहासिक भक्ती स्थळे असली तरी याकडे नगरपालिकेचे सपशेल दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळतं. नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाकडून कोणतीही दाखल घेतली जात नाही. अखेर लोकांच्या भावना लक्षात घेऊन अनिल सावंत मित्र परिवाराकडून मंगळवेढा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
चारही भक्तीस्थळे आणि आसपासचा परिसर कमालीचा अस्वच्छ झाला होता. साहजिकच त्यामुळे नागरिक देखील संतप्त होते. प्रशासनाला वारंवार तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष झाल्याने अनिल सावंत मित्रपरिवाराने स्वच्छता मोहीम हातामध्ये घेतली.
अनिल सावंत मित्रपरिवार पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यात सामाजिक उपक्रम राबविण्याचे काम करत असतो. सोबतच सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी देखील नेहमी तत्पर असल्याचं पाहायला मिळते. चार दिवसांपूर्वी अनिल सावंत मित्र मंडळाकडून नगरपालिकेच्या विहिरीची साफसफाई करण्यात आली होती. दिड हजार वर्षाची परंपरा लाभलेल्या गणेश मंदिरा लगत नगरपालिकेची विहीर आहे. या विहिरीमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या कचरा टाकल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. नगरपालिकेला तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष केले. शेवटी साफसफाई करण्याचे काम अनिल सावंत मित्रपरिवाराने पार पाडले होते.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम