T20 World Cup 2024 : 24 तासात पाच खेळाडूंनी केली निवृत्तीची घोषणा; तिघांना समजावण्याचा प्रयत्न..
T20 World Cup 2024 : नुकत्याच पार पडलेल्या टी-ट्वेंटी विश्वचषकात (T20 World Cup 2024 final) भारतीय संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला (IND vs SA) पराभूत करत भारताने दुसऱ्यांदा t20 वर्ल्ड कप किताब पटकावला. 2022 आणि 2023 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला वर्ल्ड कपने हुलकावणी दिली होती. साहजिकच त्यामुळे या t20 विश्वचषकाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलं होतं. अपेक्षाप्रमाणे भारतीय संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. या विजयाबरोबरच अनेक सिनियर खेळाडूंनी निवृत्तीची घोषणाही केली.
टी ट्वेंटी विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहली (virat kohli) निवृत्तीची घोषणा केली. विराट नंतर रोहित शर्माने देखील यापुढे मी आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी खेळणार नसल्याचे सांगितलं. काही तास उलटल्यानंतर ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने (ravindra jadeja) देखील यापुढे आपणही आंतरराष्ट्रीय t20 क्रिकेट खेळणार नसल्याचे सांगितलं. एकूणच अवघ्या 24 तासात पाच खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली आहे.
सूर्यकुमार यादवने (suryakumar yadav) एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, ड्रेसिंग रूममध्ये आम्ही रोहित आणि विराट दोघांनाही इतक्यात निर्णय घेण्याची गरज नसल्याचं सांगितलं. तुम्ही आणखी काही वर्ष खेळू शकता. इतक्या तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता नाही. 2026 मध्ये भारतातच t20 विश्वचषक होणार आहे. तोपर्यंत तुम्ही खेळण्याचा विचार करू शकता. असं अनेकांनी म्हटलं होतं. मात्र या दोघांनी कोणाचाही ऐकलं नाही. कदाचित या दोघांनी यापूर्वीच आपला निर्णय घेतला होता.
विराट कोहली आणि रोहित शर्मा बरोबर राहुल द्रविडला (rahul Dravid) देखील विनंती करण्यात आली होती. केवळ खेळाडूंनीच नाही, तर बीसीसीआयने (bcci) देखील आणखी काही काळ खेळण्याची विनंती केली होती. मात्र या तिघांनी आम्ही निर्णयावर ठाम असल्याचं सांगितलं. रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, राहुल द्रविड बरोबर केदार जाधवने (kedar Jadhav) देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
सिनियर खेळाडूंच्या अनुपस्थितीत bcci आता नवीन खेळाडूंना संधी देणार आहे. सहा जुलै पासून झिंबाब्वे दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला 5 t20 सामने खेळायचे आहेत. 5 t20 सामन्याच्या मालिकेसाठी अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यामध्ये अभिषेक शर्मा, रियान पराग, यशस्वी जायसवाल, रिंकू सिंह, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड यांचाही समावेश आहे. कर्णधार पदाची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे.
विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा t20 संघाचा भाग नसणार असले तरी कसोटी आणि एकदिवसीय संघात मात्र खेळताना दिसतील. 2025 मध्ये आगामी चॅम्पियन ट्रॉफी होणार आहे. यात भारतीय सीनियर खेळाडूंचा सहभाग असेल. चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत रोहित शर्माकडे कर्णधार पदाची धुरा देखील असणार आहे. 2052 मध्ये भारतीय संघाला चॅम्पियन ट्रॉफी आणि टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा खेळायची आहे. या दोन्ही स्पर्धा जिंकून रोहित शर्मा आपल्या कर्णधार पदाचा शेवट गोट करू इच्छित आहे.
हे देखील वाचा Mazi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या अटीत तीन मोठे बदल; आता असा करता येणार अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम