RR vs MI : टॉसला येताच रोहित नावाचा जयघोष, हार्दिकची बोलती बंद; पाहा ते दोन्ही व्हिडिओ..

0

RR vs MI : काल मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि राजस्थान रॉयल्स (rajsthan royals) यांच्यामध्ये आयपीएल 2024 चा 13 वा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात आला. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात वानखेडेवर (wankhede) मुंबई इंडियन्सचा पहिला सामना असल्याने, या सामन्याकडे अनेकांचे लक्ष लागलं होतं. यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यात हार्दिक पांड्याला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. साहजिकच त्यामुळे वानखेडे मैदानावरील चाहते हार्दिक पांड्याचे कसे स्वागत करतायत याकडे अनेकांचं लक्ष होतं.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून, रोहित शर्माकडे पाहिले जाते. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स संघाने तब्बल पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली. मात्र यावर्षी अचानक रोहित शर्माची कर्णधार पदावरून हकालपट्टी करून मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पांड्याची निवड केली. त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पांड्या या दोघांना देखील चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान यांच्यामध्ये खेळवण्यात आलेला हा तिसरा सामना होता. यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यात हार्दिक पांड्याला मोठ्या प्रमाणात चाहत्यांकडून डिवचण्याच आलं होतं. काल झालेल्या सामन्यात देखील हार्दिक पांड्याला चाहत्यांच्या रोशाला सामोरे जावे लागले. यावेळी मात्र सामन्यानंतरही हार्दिक पांड्यावर चाहते आग ओकताना पाहायला मिळाले.

या संदर्भातले दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. काल राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या टॉस करण्यासाठी मैदानात आला. पांड्या मैदानात येताच स्टेडियममध्ये उपस्थित असणाऱ्या चाहत्यांकडून रोहित-रोहित नावाचा जयघोष करण्यात आला. आपल्या घरच्याच मैदानावर हार्दिक पांड्याची झालेली नीचांकी काल चर्चेचा विषय बनली.

त्याच झालं असं, हार्दिक पांड्या संजू सॅमसन (sanju Samson) आणि समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) टॉससाठी मैदानात एकत्र आले. मात्र मैदानात उपस्थित चाहत्यांनी रोहित-रोहीत नावाचा जयघोष केला. परिस्थिती हाताबाहेर जात आहे, हे पाहून संजय मांजरेकर यांनी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या असा उल्लेख केला. तरी देखील चाहते गप्प बसायचे नाव घेत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर, टॉसचा कार्यक्रम लवकर उरकून घेण्याचा प्रयत्न मांजरेकर कडून झाला.

राजस्थान रॉयल्स संघाकडून मुंबई इंडियन्सचा दारून पराभव झाला. पराभवानंतर चाहत्यांनी हार्दिक पांड्यावर सडकून टीका देखील केली. पांड्यामुळेच मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला असल्याचं चाहते म्हणताना दिसले. रोहित शर्मा प्रचंड अनुभवी कर्णधार आहे. रोहित शर्मा कर्णधार असता तर मुंबई इंडियन्स संघाची इतकी वाईट अवस्था झाली नसती, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. एका माध्यमाला बोलताना अनेक चाहत्यांनी हार्दिक पांड्याला टार्गेट केले आहे.

हे देखील वाचा DC vs RR : कार अपघामुळे ऋषभ पंतच्या मानसिक आरोग्यावर परिणाम; आउट झाल्यानंतर केले हे कृत्य..

Hardik Pandya vs MI : तुम्ही काय काढणार, मलाच नको कर्णधारपद; त्या कारणामुळे हार्दिक पांड्याचा संताप..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.