DC vs RR : कार अपघामुळे ऋषभ पंतच्या मानसिक आरोग्यावर परिणाम; आउट झाल्यानंतर केले हे कृत्य..
DC vs RR : आयपीएल (ipl) सुरू होऊन आठवड्याभराचा कालावधी उलटला आहे. आयपीएल स्पर्धा रंगतदार अवस्थेत देखील आली आहे. आयपीएलच्या सुरुवातीलाच आयपीएलमध्ये अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडल्याचं पाहायला मिळाले आहे. आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ऋषभ पंतच्या (Rishabh pant) खेळाकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून राहिले होते. मात्र अद्याप ऋषभ पंतकडून दमदार पुनरागमन झालेलं नाही.
राजस्थान विरुद्ध (Delhi capitals vs rajsthan royals) झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंत स्वस्तात बाद झाल्यानंतर, त्याचा संताप झाला. स्वस्तात बाद झाल्यानंतर, पंत आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकला नाही. ड्रेसिंग रूमकडे जाताना पंतने पडद्यावर जोरदार बॅट आढळली. ऋषभ पंतच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ऋषभ पंतच्या या कृत्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात येत आहे.
ऋषभ पंत नेहमी आक्रमक शैलीत फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. मात्र राजस्थान विरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याला केवळ 26 चेंडूत केवळ 28 धावा करता आल्या. साहजिकच आपल्या गुणवत्तेला साजेशी खेळी करता न आल्याने तो प्रचंड चिडला. राग अनावर न झाल्याने त्याने ड्रेसिंग रूम मध्ये जाताना पडद्यावर जोरदार बॅट आपटली. त्याच्या कृत्यामुळे त्याला आता दंड देखील ठोठावला जाण्याची शक्यता आहे.
कार अपघातानंतर मैदानात पाऊल ठेवणं हीच खूप मोठी गोष्ट असल्याचं अनेकांनी म्हटलं. पहिल्या सामन्यात त्याने काही आक्रमक फटके देखील मारले. मात्र दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंत संघर्ष करताना दिसला. दिर्घकाळानंतर मैदानात पाऊल ठेवून, दमदार कामगिरी करणं इतक्या सहज शक्य नाही. हे ऋषभ पंतने ओळखायला हवं. आपल्या मानसिकतेवर नियंत्रण ठेवायला हवं, असं सोशल मीडियावर बोलले जाऊ लागलं आहे.
कोणताही अपघात केवळ शारीरिक इजा पोचवत नाही, तर मानसिक दृष्ट्या देखील मनुष्य खचला जातो. तुम्ही फिजिकली लवकर रिकव्हर होऊ शकता. मात्र तुमचं मानसिक आरोग्य पूर्वीसारखं राखू शकेल, याची कोणतीही शास्वती नसते. अशा प्रकारच्या कमेंट देखील सोशल मीडियावर लिहल्या गेल्या आहेत. खेळात मानसिक आरोग्याला फार महत्त्व असते. जर तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य उत्तम ठेवाल, तर तुम्ही परफॉर्मन्स करू शकाल. याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं देखील बोललं जाऊ लागलं आहे.
हे देखील वाचा Hardik Pandya vs MI : तुम्ही काय काढणार, मलाच नको कर्णधारपद; त्या कारणामुळे हार्दिक पांड्याचा संताप..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम