या पाच कारणांमुळे शरद पवार यशस्वी ठरले?
शरद पवार नेहमी आपल्या कामाबद्दल व आपल्या रणनीती बद्दल कोणालाही काही सांगत नाहीत. त्यांना आतापर्यंत कोणीही समजू शकले नाही. कारण ते त्यांच्या मनातल्या गोष्टी कधीच कोणाला सांगत नाहीत व कोणाला त्याचा ठावठिकाणा लागत नाही.
त्यांच्यावर कोणी टीका केली असता ते त्या टीकेला संयमाने प्रत्युत्तर देतात. पवार साहेबांबद्दल लोक अनेकदा विचार करतात कारण पवार साहेबांनी आपल्यावर टीका करणाऱ्यांचा व आपल्या विरोधात वागणारे लोकांचा हिशोब उशिरा का होईना पण चुकता केलेला आहे. मग ते स्वपक्षातील असो किंवा इतर पक्षातील असो पवार साहेब हिशोब करतात.
पवार साहेब कुठलेही अडचणीत पळ काढत नाहीत. प्रत्येक गोष्टी वर किंवा प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न राजकारणाच्या बाबतीत पवार साहेबांएवढा कोणीच करत नसेल. किती जरी वाईट प्रसंग आला किंवा बिकट परिस्थिती असेल त्या परिस्थितीत देखील पवार साहेब तरुण वयात तर नाहीतच परंतु या वयात देखील खचले नाहीत. आज कोणाची परिस्थिती असताना आपले वय पाहून ते घरात बसून राहिले नाहीत. आजही पवार साहेब शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा अडचणी त्यांचे झालेले नुकसान पहात आहेत.
त्यांच्याकडे असणारा दृढनिश्चयीपणा त्यांच्याकडून अशाप्रकारे काम करून घेत असेल. 2014 साली लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळी किंवा तेव्हापासून सर्वांना वाटू लागले की पवार साहेबांचं राजकारण संपले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला परंतु पवार साहेब कधीच खचले नाहीत व कधी त्यांनी माघार घेतली नाही.
पवार साहेबांकडे असलेला संयम हा देखील वाखाणण्यासारखा आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून संस्थापक सदस्य असलेले काही नेते पवार साहेबांना सोडून गेले. पवार साहेबांचे बरेच समर्थक असे समजू लागले की राष्ट्रवादी मध्ये थांबून आपला काही फायदा होणार नाही. त्यामुळे देखील ते पवार साहेबांना सोडून गेले. पवार साहेबांनी त्यांना कधी अडवले नाही येणार आहे जाणार आहेत जा अशी भूमिका त्यांनी पक्षाच्या बाबतील घेतली.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम