राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करून दिली आठवण!

0

परतीच्या पावसाने आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतातील उभी पिके अक्षरशः आडवी झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतानाही पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई तातडीने मिळायला हवी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

पंचनामे बाजूला ठेवून सगळे निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई तातडीने सरकारने द्यावे अशी भूमिका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मांडली आहे.

मागच्या वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नव्हते. तरीदेखील त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचं काम केलं होतं. त्याचबरोबर पंचनामे,निकश सगळं बाजूला ठेवून हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत तातडीने करावी अशी त्यांनी भूमिका घेतली होती.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसताना शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. आता मात्र ते मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री नसताना त्यांनी कोणतेही निकष न लावता हेक्टरी 25 हजाराची मदत शेतकऱ्यांना द्यावी. अशी मागणी केली होती. तीच मागणी आता त्यांनी अमलात आणण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत. असे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली आहे.

गेल्या वर्षी शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई तातडीने करण्यात यावी. यासंदर्भातला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुनही शेअरही केला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.