IPL 2024: या पाच दिग्गजांचा IPL 2024 असणार अखेरचा सिझन; दोन नावे चाहत्यांसाठी धक्कादायक..

0

IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग (Indian premier league) म्हणजेच आयपीएलकडे (IPL ) भारतामध्ये मोठ्या उत्सवा प्रमाणे पाहिले जाते. आयपीएल सुरू झाल्यापासून ही स्पर्धा दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालली आहे. भारतीय संघाचे भाग नसणारे अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसतात. त्यामुळे चाहत्यांसाठी हा एक सुखद आणि आनंदाचा क्षण असतो. मात्र यावर्षी अनेक दिग्गजांचा हा अखेरचा आयपीएल सीझन असणार आहे.

2024 मध्ये लोकसभेच्या निवडणूक होणारा असल्याने, आयपीएल 2024 हा सिझन लवकर घेण्यात येणार आहे. क्रिकेट चाहत्यांना 2024 चा हंगाम 15 मार्चच्या आसपास सुरू होताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी 19 डिसेंबर पासून 2024 च्या हंगामासाठीचा लिलाव पार पडणार आहे. आयपीएलचा माहोल तयार करण्यात येत असला तरी पुढच्या वर्षीअनेक क्रिकेट चाहत्यांची निराशा करणारा सीजनही ठरणार आहे.

आयपीएल 2024 मध्ये पाच बड्या खेळाडूंचा हा अखेरचा सिझन असल्याचं देखील बोललं जात आहे. फक्त आयपीएलचाच नाही तर भारतीय संघाचा देखील सर्वात सक्सेसफुल कॅप्टन म्हणून महेंद्रसिंग धोनीचे (MS dhoni) नाव घेतलं जातं. आयसीसीच्या तीन्ही ट्रॉफी जिंकणारा महेंद्रसिंग धोनी एकमेव कर्णधार आहे. मात्र महेंद्रसिंग धोनीचा पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये होणारा आयपीएल सीझन हा अखेरचा सीजन असणार आहे.

महेंद्रसिंग धोनी सध्या 43 वर्षाचा आहे. वयाबरोबर त्याचा फिटनेस देखील फारसा चांगला नाही. नुकतेच त्याच्या गुडघ्याचे ऑपरेशन देखील करण्यात आले आहे. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीचा हा अखेरचा आयपीएल सीझन असेल असं बोललं जात आहे. महेंद्रसिंग धोनी नंतर दिनेश कार्तिकचा देखील 2024 मध्ये होणार सिझन अखेरचा आयपीएल सीझन असणार आहे. सद्या दिनेश कार्तिक आरसीबीकडून खेळत आहे. त्याचे वय देखील 38 आहे. मात्र तो आयपीएल व्यतिरिक्त कोणतेही क्रिकेट खेळत नाही. त्यातच गेल्यावर्षी त्याचा फॉर्म देखील फारसा चांगला राहिला नव्हता.

2024 नंतर महेंद्रसिंग धोनी क्रिकेट खेळताना दिसणार नाही. चाहत्यांसाठी हा मोठा धक्का असेल. धोनी नंतर अनेकांना आश्चर्य चकित करणारे नाव म्हणजे रोहित शर्मा. रोहित शर्माचा देखील हा आयपीएलचा अखेरचा सीजन ठरू शकतो. रोहित शर्माचे (Rohit Sharma) वय 36 आहे. हे वय पाहता आणखी दोन सीजन तो आरामात खेळू शकतो. मात्र त्याचा फिटनेस देखील फारसा चांगला नाही. त्यातच 2024 नंतर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सचा कर्णधार देखील असणार आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएस सीझनमध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन संघाचे कर्णधार पद भूषवणार आहे. मात्र 2024 नंतर मुंबई इंडियन्स संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे देण्यात येणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळण्यासाठी तयार होणार की नाही, मोठा प्रश्न आहे. मुंबई इंडियन्सने जर हार्दिक पांड्याकडे संघाची धुरा दिली, तर रोहित शर्मा आयपीएल मधून निवृत्ती जाहीर करू शकतो.

महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक बरोबर विकेटकीपर फलंदाज वृद्धिमान साहा आणि लेग स्पिनर अमित मिश्रा या दोघांचा देखील 2024 हा सीजन अखेरचा सीजन ठरण्याची शक्यता आहे. वृद्धिमान साहा गुजरात टायटन, तर अमित मिश्रा लखनऊ संघाकडूनखेळत आहेत.

हे देखील वाचा Virat Kohli T20 world Cup: Virat kohli पुन्हा BCCI च्या टार्गेटवर; T20 World Cup साठी विराट ऐवजी तिसऱ्या क्रमांकावर या खेळाडूला संधी..

Rohit Sharma BCCI meeting: रोहित शर्माचा BCCI ला सवाल, अन् हार्दिक पांड्या पुन्हा अडचणी..

T20 World Cup: रोहित शर्माच्या कर्णधार पदाला आव्हान दिले; आता तोच T-20 World Cup मधून आउट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.