Goutami Patil: पाटील हे आडनाव फक्त मराठा समाजातच आहे का? 

Goutami Patil: गौतमी पाटील आणि वाद हे समीकरण नवीन नाही. गेल्या वर्षभरापासून गौतमी पाटील खूपच चर्चेत असते. गौतमी पाटील नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत येत असते. सुरुवातीला तिने केलेल्या हावभावामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टिका झाली. त्यानंतर गौतमी पाटीलने जाहीरपणे माफी मागितली आणि इथून पुढे अशी चूक करणार नसल्याचे देखील सांगितले. परंतु तरीदेखील गौतमी पाटीलवरील टिका काही थांबली नाही.

 

ज्या ठिकाणी गोतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्या ठिकाणी युवक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. बऱ्याचदा तरुण स्टेजवरती जाण्याचा प्रयत्न करतात. यामुळे बऱ्याच वेळा कार्यक्रम देखील थांबवला जातो. लाठीचार्ज करून देखील तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यामुळे मग गौतमीच्या कार्यक्रमाची बातमी ही ठरलेलीच असते. त्यामुळे मग गौतमी बाबत समिश्र प्रतिक्रिया येताना आपल्याला पाहायला मिळतात. बरेच लोक गौतमीचे समर्थन करतात तर काही लोक तिच्यावर टिका करतात. तसेच महाराष्ट्राची संस्कृती बिघडवत असल्याचा आरोप देखील गौतमी पाटीलवर होत असतो.

 

यामुळे आता मराठा समाजातील काही संघटनांनी गौतमीने पाटील हे आडनाव वापरू नये असा पवित्रा घेतला आहे. या प्रकरणात काही लोकांनी गौतमीची बाजू घेतली तर काहींनी गौतमीच्या विरोधात भूमिका घेतली. परंतु पाटील हे आडनाव फक्त मराठा समाजातच आहे का? हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला असेल. तर पाटील हे आडनाव फक्त मराठा समाजात नसून तर इतर समाजातील लोकांचे देखील पाटील हे आडनाव असते. त्याचे कारण असे की पूर्वी पाटीलकी फक्त एकाच समाजाकडे नव्हती. तर धनगर, माळी, लोणारी, सुतार, कोळी, आगरी कोळी, अशा बऱ्याच समजातील लोकांकडे पाटीलकी होती.

 

अर्थात पूर्वीच्या काळी बऱ्यापैकी पाटीलकी ही फक्त एका विशिष्ठ समाजाकडे नव्हती. परंतु महाराष्ट्रात मराठा समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने बऱ्याच गावची पाटीलकी ही मराठा समाजातील लोकांकडे होती. त्यामुळे पाटील हे आडनाव मराठा समाजातच नसून इतर समाजात देखील असल्याचे पाहायला मिळते.

महाराष्ट्र लोकशाही व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा. https://chat.whatsapp.com/IyJbKoz0gFl8OYpfnJlm1C

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.