RCB vs LSG: विराट कोहलीच्या त्या कृत्यामुळे नवीन उल हलने कोहलीला ढकलले; पाहा दोन्ही व्हिडिओ..

0

RCB vs LSG: लखनऊ सुपर जाइंट आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Lucknow super giants vs royal challengers Bangalore) यांच्यामध्ये आयपीएल सीझन (16 IPL season16) चा 43वा सामना काल लखनऊच्या मैदानावर पार पडला. लो स्कोरिंग मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबी संघाने 126 धावा केल्या. मात्र लखनऊ संघाला RCB संघाने केवळ 108 धावांत गारद करत हा सामना 18 धावांनी जिंकला. मात्र या सामन्यापेक्षा अधिक चर्चा झाली मैदानावरील राड्याची.

गौतम गंभीर आणि विराट कोहली (Gautam Gambhir and Virat kohli) या दोघांमध्ये सगळं काही अलबेल नाही. हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. 2012 साली झालेल्या आयपीएलमध्ये या दोघांच्या नात्यात पहिली ठिणगी पडली होती. तेव्हापासून या दोघांमध्ये कायम 36चा आकडा राहिला आहे. या सिझनमध्ये लखनऊ आणि आरसीबी संघाने खेळलेल्या पहिल्या सामन्यात लखनऊ संघाने आरसीबीवर थरारक विजय मिळवला होता. विजय मिळवल्यानंतर, लखनऊ संघाचा कोच गौतम गंभीर आणि खेळाडूंनी चांगलं अग्रेशन दाखवलं होतं.

..म्हणून चिडला विराट

सामना जिंकल्यानंतर गौतम गंभीर मैदानावर आला. आणि त्याने प्रेक्षकांना गप्प बसण्याचा इशारा तोंडावर बोट ठेवून केला. कालच्या सामन्या देखील विराट कोहलीने तोंडावर बोट ठेवून गप्प राहण्याचा इशारा करू नका, असा इशारा दिला. सामना सुरू असताना विराट कोहली जबरदस्त अग्रेशन दाखवताना पाहायला मिळत होतं. अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन उलहक आणि दिनेश कार्तिक मध्ये काहीतरी बाचाबाची झाली.

दिनेश कार्तिकला नवीन उल हक (Naveen-ul-Haq) बोलल्याने विराट कोहलीने त्याला सुनावले. मात्र नवीन उल हक विराट कोहलीला (Naveen-ul-Haq and Virat kohli) देखील भिडला. सतराव्या षटका दरम्यान दोघांमध्ये शब्दांची बचाबाची झाली‌. या दोघांचा भांडण सोडवण्यासाठी फलंदाजी करत असणाऱ्या अमित मिश्राने मध्यस्थी केली. मात्र तरीदेखील अफगाण खेळाडू माघार घ्यायला तयार नसल्याचं पाहायला मिळालं.

विराट कोहलीच्या त्या कृत्यानंतर भडकला नवीन उल-हक..

सुरुवातीला नविनने दिनेश कार्तिक सोबत बाचाबाची केली. मग विराट कोहलीने नवीनला सुनावल्यानंतर, सिनियर खेळाडूचा रिस्पेक्ट म्हणून नवीनने माघार घ्यायला हवी होती. मात्र त्याने माघार घेतली नाही. आणि विराट कोहली सोबतच भांडायला सुरुवात केली. मग मात्र विराट कोहलीचा पारा चढला.

विराट कोहलीने क्रिकेटचा बाप मी आहे, तू अजून कुठेच नाही. हे दाखवण्याचा प्रयत्न केला. आपल्या शूजला लागलेली माती बाहेर काढत तू माझ्या या ठिकाणी आहेस, असं एक प्रकारे त्याला दर्शवण्याचा प्रयत्न विराटने केला. विराट कोहलीचे हेच कृत्य नवीन उल हकला पचनी पडले नाही. आणि म्हणून, तो कोहलीवर भडकला.

विराट कोहलीने नवीनला त्याची लायकी दाखवली..

सिनियर खेळाडूंचा रिस्पेक्ट न केल्यामुळे विराट कोहली भडकला. दिनेश कार्तिकचा नवीनने अपमान केला. ही गोष्ट विराटला सहन झाली नाही. तू अजून क्रिकेटमध्ये लहान आहेस. हे दाखवण्याचा विराटने प्रयत्न केला. नवीन माघार घ्यायला तयार नाही, ही बाब लक्षात घेऊन विराटने त्याच्या बुटातील माती काढत तू आमच्या या ठिकाणी आहेस, हे सांगण्याचा एकप्रकारे प्रयत्न केला.

नवीनने झटकला विराट कोहलीचा हात

सामना संपल्यानंतर, हात मिळवणी करताना विराट कोहली आणि नवीन उल हक समोरसमोर आले. दोघांनी एकमेकांशी हात मिळवणी केली. विराटचे मैदानावरील कृत्य नवीनच्या अजूनही लक्षात होतं. मैदानावर घडलेल्या गोष्टी सामना संपल्यानंतर, त्याच ठिकाणी सोडून द्यायच्या असतात. मात्र नवीनला चांगलाच माज असल्याचं या सामन्यात पाहायला मिळाले.

विराट आणि नवीन उल हक हत मिळवणी करत असताना बराच वेळ नवीनने विराट कोहलीचा हात पकडून ठेवला. दोघे एकमेकांना हात मिळवणी करताना बोलत असल्याचं पाहायला मिळालं. अचानक विराट कोहलीचा हात नवीन झटकत विराट कोहलीला पुन्हा डिवचले. नवीनने विराटचा हात झटकल्यानंतर, विराट कोहली पाठीमागे वळला, मात्र मॅक्सवेलने मध्यस्थी करत या दोघांचे भांडण मिटवलं. हे दोन्ही व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान वायरल झाले आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.