Chanakya Niti: स्त्री-पुरुषांना लग्नापूर्वी या चार गोष्टी माहीत असायलाच हव्या अन्यथा..

0

Chanakya Niti: लग्न झाल्यानंतर स्त्री आणि पुरुष (men and women) दोघांच्याही जिवनात (life) अनेक बदल घडून येतात. लग्नापूर्वी (after marriage) कुठलीही विशेष जवाबदारी आपल्यावर नसते. परिणामी आपण मनमोकळे जगत असतो. मात्र लग्न होताच यामध्ये बदल होतो. लग्नानंतर स्त्री आणि पुरुष दोघांनाही एका वेगळ्या जबाबदारीतून जावे लागते. यासोबतच लग्नानंतर सुखाने संसार थाटता यावा याकरिता विशेष काळजी सुद्धा घ्यावी लागते. अन्यथा लग्नानंतर छोट्या-छोट्या गोष्टींवरुन खटके उडून सुखी संसारात अनेक बाधा निर्माण होतात. या सगळ्यापासून बचाव करण्यासाठीच काही महत्वाच्या गोष्टींच्या नोंदी आचार्य चाणाक्य यांनी करुन ठेवल्या आहेत.

आचार्य चाणाक्य (aacharya Chanakya) यांनी त्यांच्या चाणाक्य नितीमध्ये (chanakya niti) अनेक महत्वांच्या विषयांवर प्रकाश टाकला आहे. चाणाक्य यांनी केलेले उपदेश आज सुद्धा तंतोतंत लागू पडतात. राजकारण, आरोग्य तसेच मानसशास्त्रावर सुद्धा आचार्य चाणाक्य यांनी भाष्य केले आहे. त्याचप्रमाणे सुखी जिवन जगण्याचे मुलमंत्र सुद्धा त्यांनी दिले आहे. याचाच भाग म्हणून लग्नानंतर सुखी आणि समाधानी जिवन कसे जगता यावे? यासाठी कुठल्या महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्यावे? व कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी? याबद्दल आचार्य चाणाक्य यांनी सांगितले आहे. आजच्या या लेखात आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत.

वयात अंतर..

लग्न होणार्‍या जोडप्याच्या वयाच्या अंतरात सहसा जास्त अंतर असू नये. दोघांच्या वयात जास्त अंतर असल्यास काही समस्या उद्भवू शकतात. वयात जास्त अंतर असल्यास नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता सर्वाधिक असते. सहसा कमी वयाच्या मुलीचे जास्त वय असलेल्या पुरुषासोबत लग्न झाल्यास दोघांमधील समजुतदारपण कमी होतो. बर्‍याचदा पुरुष मनमर्जीप्रमाणे वागू लागतो. त्यामुळे त्या मुलीचे मन दुखावले जाऊ शकते. अशावेळी तिचा नात्यातील उत्साह कमी होत जातो. परिणामी नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

नात्यामध्ये आदराला फार महत्वाचे स्थान आहे. कुठलेही नाते असो, मान-सन्मान आणि आदर नात्यात असलाच पाहिजे. अन्यथा नाते तुटायला वेळ लागत नाही. बर्‍याचदा आपण बघतो की, पुरुषाकडून महिलेचा पाहिजे त्या प्रमाणात आदर केला जात नाही. चूल आणि मूल एवढ्यापुरतीच स्त्री उपयोगाची आहे. अशी मुर्ख मानसिकता बर्‍याच पुरुषांची असते. त्यामुळे ते आपल्या पत्नीचा योग्य आदर करत नाहीत. तसेच वारंवार तिच्या चुकांचे जाहीर प्रदर्शन करतात. अशावेळी पत्नीचे मन नाराज होऊन नात्यातली गंभीरता हळूहळू संपू लागते. परिणामी नात्यात मोठा दुरावा सुद्धा निर्माण होतो असं आचार्य चाणक्य सांगतात.

आपण बर्‍याचदा आपल्या आजूबाजूला पाहतो, धावपळीच्या युगात पती-पत्नीला एकमेकांशी बोलायला सुद्धा वेळ नाही. दोघेही आपापल्या कामात व्यस्थ असल्यामुळे ते एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. मोठ्या शहरांमध्ये तर मोठ्याप्रमाणात आपल्याला हे चित्र बघायला मिळते. सतत कामात व्यस्थ असल्यामुळे आणि एकमेकांना पुरेसा वेळ न दिल्याने सुद्धा काही समस्या निर्माण होतात. हळूहळू संवाद कमी होतो. सततच्या कामाच्या व्यापामुळे वैवाहिक जिवनाचा आनंद घेता येत नाही. अशावेळी नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संसारात सुख प्राप्त करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ आपण आपल्या जोडीदाराबरोबर घालवला पाहिजे.

मानसिकदृष्ट्या निरोगी

आपण बघतो की, कायम कामात असल्याने शरीरासोबतच आपले मन सुद्धा थकते. आजकालच्या जिवनात कामाचा व्याप एवढा वाढलाय की अनेकांचे मानसिक आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. परिणामी अनेकांना नैराश्याचा सामना सुद्धा करावा लागतो. लग्नानंतरचे दिवस अगदी आनंदाने घालवायचे असतील तर याकडे सुद्धा लक्ष देणे फार गरजेचे आहे. मानसिककदृष्ट्या आपण कायम फ्रेश असायला हवे. आपले मन क्षीण झालेले असले किंवा आपण ताण-तणावात असलो तर त्याचा परिणाम लगेच शरीरावर होतो. त्यामुळे दोघांपैकी एक जरी मानसिककदृष्ट्या निरोगी नसेल, तर नात्यातला ओलावा हळूहळू निघून जातो. त्यामुळे सुखी आणि समाधानी संसाराचा गाडा हाकण्यासाठी या काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे.

 हे देखील वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.