RCBvsGT: बोल्ड होऊनही मॅक्सवेल झाला नाही बाद, हार्दिक पांड्यासह राशिद खाननेही धरलं डोकं; पहा व्हिडिओ..

0

RCBvsGT: रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि गुजरात टायटन्समध्ये (RCB vs GT) काल मुंबईच्या वानखेडे मैदानावर (wankhede cricket stadium) खेळविण्यात आलेल्या IPL 2022 च्या 67 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगलोर संघाने 8 विकेट आणि ८चेंडू शिल्लक राखत दणदणीत विजय मिळवला. आणि या स्पर्धेतील ‘प्ले ऑफ’ मध्ये जाण्याचे आव्हान कायम राखलं. रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाला आता प्ले ऑफ’मध्ये (playoff) पोहचण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स (Delhi capital) पराभूत होण्याची वाट पाहावी लागणार आहे. बंगलोर संघाने हा सामना जिंकत या स्पर्धेतील आव्हान कायम राखला असला तरी, हा सामना अनेक कारणांनी चांगलाच चर्चेत राहिला.

खराब फॉर्ममधून जात असणारा विराट कोहलीला (Virat Kohli) या सामन्यात सूर गवसला. विराट कोहली आणि आरसीबीच्या(RCB) चाहत्यांसाठी खूप आनंदाची बाब आहे. मात्र या बरोबरच या सामन्यात आणखी एक चर्चेत राहणारी घटना घडली, ती म्हणजे ग्लेन मॅक्सवेल खेळायला आल्यानंतर राशिद खानने टाकलेल्या चेंडूवर मॅक्सवेल त्रिफळाचीत होऊन देखील बाद झाला नाही. आता तुम्हाला वाटत असेल, त्रिफळाचीत झाल्यानंतर, मॅक्सवेल नॉट आउट कसा असेल? तर त्याचं झालं असं, फाफ डु प्लेसिसला राशिद खानने‌ झेलबाद केल्यानंतर, फलंदाजी करण्यासाठी ग्लेन मॅक्सवेल मैदानात आला. राशीद खानने टाकलेल्या पहिल्या चेंडूवर मॅक्सवेल उत्तुंग षटकार लगावण्याच्या नादात त्रिफळाचीत झाला, पण बेल्स पडली नाही. आणि चेंडू स्टंम्पला लागून सीमारेषेपार गेला.

राशिद खानने मॅक्सवेल त्रिफळाचीत करून देखील स्टंम्पवय असणाऱ्या बेल्स उचल्या गेल्या, लाईट देखील लागली, मात्र बेल्स खाली पडल्या नाही. आणि म्हणून मॅक्सवेलला नॉट आउट देण्यात आलं. राशिद खानने टाकलेला चेंडू स्टंम्पला लागून, लाईट लागली. मात्र बेल्स खाली पडला नसल्याने, अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. गुजरात टायटनचा कर्णधार हार्दिक पांड्या, यष्टीरक्षक मॅथ्यू वेड, आणि गोलंदाज राशिद खान तोंडात बोटे घालून काही काळ मैदानावरच बसल्याचं पाहायला मिळालं. मॅच दरम्यानच्या हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

त्यानंतर केली वादळी खेळी

169 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या बंगलोर रॉयल चॅलेंजर्सच्या सलामवीरांनी गुजरात टायटन्स संघांच्या गोलंदाजांना डोकं वर काढू दिले नाही. दोन वर्षांपासून खराब फॉर्ममधून जाणारा कोहली आपल्या चाहत्यांना जुन्या अंदाजात पाहायला मिळाला. विराट कोहलीचे अग्रेशन आणि त्यांच्या बॅटला लागणारा चेंडू या सामन्यात पाहण्यासारखा होता. सुरुवातीपासूनच गुजरात टायटनच्या गोलंदाजांवर तुटून पडलेल्या विराट कोहलीने 54 चेंडूत 73 धावांची बहारदार खेळी केली.

कर्णधार फाफ डू प्लेसीस आणि विराट कोहली या दोघांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल ११५ धावांची भागीदारी केली. डु प्लेसिस 44 धावांवर बाद झाल्यानंतर, फलंदाजीसाठी धोकादायक समजला जाणारा मॅक्सवेल खेळपट्टीवर आला आणि मॅक्सवेलने वादळी खेळी साकारली. पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला, मात्र बेल्स खाली न पडल्याने त्याला नॉट आउट देण्यात आलं, मात्र त्यानंतर मॅक्सवेलने वादळी खेळी करत अवघ्या १८ चेंडूत नाबाद ४० धावांची खेळी केली. पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत होऊन देखील बाद न झाल्याने, मॅक्सवेलने खेळलेली ही खेळी खूप चर्चेचा विषय बनली आहे.

..तर बॅगलोर जिंकणार IPL 2022 ची ट्रॉफी

निर्णायक सामन्यात विजय संपादन करत रॉयल चॅलेंजर बेंगलोरने या स्पर्धेत प्ले ऑफ’मध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. रॉयल चॅलेंजर बेंगलोर ‘प्ले ऑफ’मध्ये पोहोचण्यासाठी दिल्ली आणि मुंबई यांच्यात होणाऱ्या सामन्यांमध्ये दिल्ली पराभत होण्याची वाट त्यांना पहावी लागेल. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्यात दिल्ली पराभूत झाली, तर ‘प्ले ऑफ’मध्ये बेंगलोर रॉयल चॅलेंजर हा संघ दाखल होणार आहे. सोशल मीडियावर ‘प्ले ऑफ’मध्ये बेंगलोर हा संघ जर दाखल झाला तर, या संघाला ही स्पर्धा जिंकण्यापासून कोणीही रोखू शकणार नसल्याचं बोललं जात आहे.

https://www.iplt20.com/video/45638/bails-light-up-but-maxi-survives?tagNames=2022

सुरूवातीच्या फलंदाजांनी या स्पर्धेत उत्तम कामगिरी केली नसताना देखील हा संघ या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करू शकला. या संघाकडे जबरदस्त बॉलिंग आहे. याबरोबरच या संघाकडे दिनेश कार्तिकच्या रूपात जबरदस्त फिनिशर देखील आहे. आणि आता किंग कोहलीने देखील ज्या पद्धतीने आपला फॉर्म पकडला आहे, हे पाहता हा संघ जर ‘प्ले ऑफ’मध्ये पोहोचला, तर पुढे या संघाला पराभूत करणं आता खूप मोठं आव्हान असल्याचं बोललं जात आहे.

हे देखील वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.