KCC: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता ग्रामपंचायतमध्येच मिळणार किसान क्रेडिट कार्ड; जाणून घ्या सविस्तर..
KCC: प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेच्या (PM Kisan) सर्व लाभार्थ्यांना आता ‘किसान क्रेडिट कार्ड’ (kisan credit card) उपलब्ध करून देणारी मोहीम केंद्र सरकारने हाती घेतली आहे. ही मोहीम भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राबवण्यात येणार आहे. म्हणजे आत्मनिर्भर भारताचाच हा एक भाग असणार आहे. या मोहिमेचं नाव “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” असं असून, 24 एप्रिल, 2022 ते 1 मे, 2022 या कालावधीमध्ये ही मोहीम देशभर राबवली जाणार आहे.
“किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” या मोहिमेअंतर्गत 24 एप्रिल, 2022 ते 1 मे, 2022 या कालावधीमध्ये ‘पीएम किसान’ योजनेच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना केसीसी (KCC) म्हणजे ‘किसान क्रेडिट कार्ड’ उपलब्ध करून दिलं जाणार आहे. किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी शेतकरी मोठी धडपड करताना पाहायला मिळत होता. अनेकांनी हे ‘क्रेडिट कार्ड’ मिळावे म्हणून, प्रयत्न केले. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. आणि मग अनेक शेतकऱ्यांनी याचा नाद सोडून दिला.
मात्र आता ‘पीएम किसान योजने’चा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना केंद्र सरकार ‘किसान क्रेडिट कार्ड’ उपलब्ध करून देणार आहे. यासाठी गावातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीने या संदर्भात तातडीने ग्रामसभा देखील बोलावण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. उद्याच्या 24 एप्रिलला राज्यामधील सर्व ग्रामपंचायतींनी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजने’च्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना ‘किसान क्रेडिट कार्ड’ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यास सांगितले आहे.
ग्रामपंचायतींनी आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेत ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजने’च्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना ‘किसान क्रेडिट कार्ड’ देण्यासंबंधीचा विहीत नमुन्यातील अर्ज देण्यात येणार आहे. “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” या मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाने यासंदर्भातील सविस्तर कार्यप्रणाली (SOP) उपलब्ध केली आहे. पीएम किसान योजनेतील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सहकार, महसूल, ग्रामविकास, पशुसंवर्धन, कृषि, जिल्हा अग्रणी बँक, अशा सर्व यंत्रणांनी समन्वय साधून, ही मोहीम पार पाडायची आहे. ही मोहीम जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणार आहे.
यासंबंधी विशेष ग्रामसभेत संबंधित सर्व बँका किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याच्या विहित कार्यपध्दतीनुसार, किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांचे अर्ज विशेष ग्रामसभेत घेणार आहेत. आणि एक मे 2022 पर्यंत शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मंजूर करण्याची कारवाई पूर्ण करणार आहेत.
यासंबंधी जिल्हा अग्रणी बँक यांनी आपल्या कार्यक्षेत्रामधील सर्व बँकांना या योजनेतील लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याचे आदेश काढले आहेत. ज्या शेतकऱ्यांना ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ मिळत आहे, अशा शेतकऱ्यांचे बँक खाते आधारीत पेमेंटसाठी अधिकृत करून घेण्याचे आदेश कृषि आयुक्त यांनी दिले आहेत.
राज्यात एकूण किती किसान क्रेडिट कार्ड धारक आहेत?
महाराष्ट्र राज्यात पंतप्रधान कृषी सन्मान योजनेचा लाभ घेणारे एकूण 114.93 लाख शेतकरी आहेत. त्यापैकी किसान क्रेडिट कार्ड असणारे शेतकरी केवळ 81.36 लाख शेतकरी आहेत. याचा अर्थ राज्यात अजूनही 33.57 लाख ‘पीएम किसान’ योजनेच्या लाभार्थ्यांना ‘किसान क्रेडिट कार्ड’ मिळालेले नाही. आणि म्हणून, केंद्र सरकारने “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” या योजनेअंतर्गत ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना ‘किसान क्रेडिट कार्ड’ देण्याची ही मोहीम हाती घेतली आहे.
हे देखील वाचा Tata Consultancy Services: मध्ये ४० हजारांची मेगा भरती! आयटीसी या क्षेत्राच्या विद्यार्थ्यांनाही सुवर्णसंधी; असा करा अर्ज..
Emergency Led Bulb: लाईट गेली तरी चालूच राहतिल हे एलईडी बल तब्बल..; ॲमेझॉनवर सेल सुरू..
Dinesh Karthik: तुझ्या मित्राचं मूल माझ्या पोटात आहे! दिनेश कार्तिकच्या पत्नीने स्वतः त्याला सांगितलं आणि पायाखालची जमीन सरकली..,” वाचा ही कहाणी..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम