ठाकरे सरकारचा पुन्हा दणका: राणे पितापुत्र मालवणी पोलिसांच्या ताब्यात; काय होणार पुढे? वाचा सविस्तर
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane) आणि त्यांचे पुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिशा सालियन प्रकरणी मालवणी पोलीस (malvani police) स्टेशनमध्ये नुकतीच हजेरी लावली आहे. दिशा सालियनन (Disha Salian) हे प्रकरण आता राणे पितापुत्रांना आता चांगलेच भोवले असून, या प्रकरणात मालवणी पोलिस कसून चौकशी करत असल्याचं समोर आले आहे. कोर्टाकडून दोघांनाही दहा तारखेपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला असला तरी, चौकशीसाठी दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी लागत असल्याने, राजकारण चांगलेच तापले आहे.
शिवसेना (shivsena) आणि नारायण राणे हा वाद गेल्या काही महिन्यांपासून अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि खासकरून ठाकरे कुटुंबावर राणे पितापुत्र टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे, वेळोवेळी दिसून आलं आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी देखील नारायण राणे यांनी अनेक धक्कादायक आरोप करताना अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना टार्गेट केलं. दिशा सालियनने आत्महत्या नाही तर तिच्यावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा नारायण राणे यांनी केला होता.
एका पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी दिशा सालियन हिने आत्महत्या केली नसून, तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि बलात्कार झाल्यानंतर तिचा खून करण्यात आला. असा खुलासा केला होता, याबरोबरच त्यांनी दिशा सालियनचा पोस्टमार्टम रिपोर्ट अद्याप आला नसल्याचं म्हटलं ह़ोतं. दिशाला ज्या बिल्डिंगवरुन ढकलून देण्यात आलं, त्या बिल्डिंगच्या वाचमेन कुठे गायब आहे? वाचमनच्या त्या दिवशीच्या रजिस्टरमधील दोन पानं का फाडण्यात आली? असे अनेक प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केले होते.
एकीकडे नारायण राणे यांनी केलेल्या धक्कादायक आरोपांनंतर दिशा सालियन हिच्या आई-वडिलांनी मात्र दिशा सालियनवर बलात्कार झाला नाही. असा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हे आम्ही पाहिलं आहे. तिने आत्महत्या केल्याचे स्पष्ट आहे, पोलिसांनी आम्हाला सगळी माहिती दिली आहे. कृपया आम्हाला आणि दिशाला बदनाम करण्याचं काम करू नका, असं माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. जर आमची अशीच बदनामी करण रहाल तर, आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर, त्याला तुम्ही जबाबदार असाल, असा इशारा देखील त्यांनी अप्रत्यक्ष नारायण राणे यांना दिला होता.
दिशा सालियनच्या आई-वडिलांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर, मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी महिला आयोगाला अर्ज करत दिशा सालियन आणि तिच्या आई-वडिलांची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात ही विनंती केली. त्यानंतर राज्या महिला आयोगाने देखील आई वडिलांची तक्रार आणि किशोरी पेडणेकर यांच्या विनंतीनुसार, मालवणी पोलिसांना या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी चौकशी केल्यानंतर, नारायण राणे नीतेश राणे आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला. अशी माहिती त्यांनी राज्य महिला आयोगाला दिली आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली होती. आता या प्रकरणात नितेश राणे आणि नारायण राणे यांना चौकशीसाठी मालवणी पोलिसांनी पोलिस स्टेशनला बोलवले असून, या दोघांनी नुकतीच हजेरी देखील लावली आहे. दोघेही चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले असून, या दोघांना पोलीस काय-काय विचारणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. दहा तारखे नंतर या दोघांना अटक देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा. शेतकरी पुन्हा दिल्ली बॉर्डरवर; शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन का पुकारले? वाचा सविस्तर
बाबासाहेब आणि अमिताभ बच्चन चित्रपटात एकाच फ्रेममध्ये का दाखवले? कारण जाणून ठोकाल सलाम…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम