“बापाची सगळी संपत्ती पोराने विकून टाकल्यावर पोरगा म्हणतोय..,” कधी न बोलणाऱ्या ‘या’ व्यक्तीने संसदेत मोदींची हवाच काढली

0

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात, काँग्रेस पक्षाने आपला बोलबाला दाखवल्याचे पाहायला मिळाले. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधीचे भाषण कमालीचं व्हायरल झालं. राहुल गांधीचे भाषण सोशल मीडियावर तुफान वायरल झालं, आणि मोठ्या प्रमाणात अनेकांकडून या भाषणाचे कौतुक देखील करण्यात आलं. राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणात अनेकांकडून कौतुक होत असल्याने भारतीय जनता पार्टी बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले.

नेहमी विरोधकांच्या वक्तव्यावर, भाषणावर आपण स्वतःहून हल्लाबोल करायचा, म्हणजे त्यांच्या भाषणाला फारसं कोणी गांभीर्याने घेणार नाही. ही भारतीय जनता पार्टीची जुनी पद्धत राहीली आहे. असं अनेकांकडून नेहमी बोलण्यात येतं, मात्र आता लोकांना देखील हे पसंत पडत नसल्याचे दिसून येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा होत असतानाच, या अधिवेशनात काँग्रेसच्या एका राज्यसभा खासदाराचे देखील फार मोठ्या प्रमाणात कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

भारतीय जनता पार्टी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेहमी 70 वर्षे काँग्रेसने काय केले? हा मुद्दा उपस्थित करताना पाहायला मिळते. नेहरू, गांधींनी सत्तर वर्ष देशाला लुटून खाल्लं असल्याचा आरोप सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून केला जात़ असल्याचं, पाहायला मिळते. विरोधकांकडून, महागाई बेरोजगारी या प्रश्नावर सरकारला बोलायला लावल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे अनेक प्रवक्ते हे सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं? असा प्रतीसवाल उपस्थित करतात, आणि चर्चा भरकटवण्याचं काम करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो.

सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं, हा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान देखील उपस्थित झाला. आणि काँग्रेसच्या एका राज्यसभेच्या खासदारांनी भाजप आणि नरेंद्र मोदींना त्यांच्याच स्टाईलमध्ये धुऊन काढण्याचं पहिला मिळालं. काँग्रेसचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष श्रीनिवास यांनी आसामचे राज्यसभेचे ‘रिपुन बोरा’ या खासदारांचा दोन मिनिटाच्या भाषणाचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

राज्यसभेचे खासदार ‘रिपून बोरा’ यांनी या भाषणात नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीला कमालीचे धुतल्याचे दिसून येत आहे. तुम्ही सारखं सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं,काय केलं विचारतात? आमच्याकडे एक म्हण आहे, एखाद्या चांगल्या बापाची एखादी नीक्कमी ओलांद जन्मते. आणि ती आपल्या बापाने कमावलेली सगळी संपत्ती विकून टाकते. सगळं विकून टाकल्यानंतर म्हणते, माझ्या बापाने माझ्यासाठी काय केलं? अगदी अशीच परिस्थिती देशातही झाली असल्याचा, घणाघात खासदारांनी केला. राहुल गांधीनंतर त्यांच्या त्या भाषणाची जोरदार चर्चा आता होत असून, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील होताना पाहायला मिळतोय.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.