धक्कादायक..! देवेंद्र फडणवीस यांचीच एसटी कर्मचाऱ्यांची वाट लावली; फडणवीसच सर्वस्वी जबाबदार

0

गेल्या दोन सव्वा-दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे, ही मागणी लावून धरली आहे. एकीकडे कर्मचार्‍याच्या पगारात 41 टक्के वाढ होऊन देखील, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 18 हजारांवर गेली असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. या सगळ्या गोंधळात विरोधी पक्ष राजकारण करत असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात येत असल्याचे दिसून येत असून, आता यात अमोल मिटकरी(Amol mitkari) यांनी उडी घेतली आहे.

महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या पगारात कुटुंब चालवणं शक्य नसल्याने, एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाचं राज्य शासनातमध्ये विलिनीकरण करावं, मी लावून धरत जवळपास सर्वच एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला.(ST workers strike) या संपाला विरोधी पक्षाने पाठिंबा देत कुठल्याही परिस्थितीत राज्य शासनमध्ये विलीनीकरण झाल्याशिवाय माघार घेतली जाणार नसल्याचं जाहीर केलं. मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसोबत भाजपचे विधानपरिषदेचे दोन आमदार देखील सहभागी झाले.

सदाभाऊ खोत(sadabhau khot) आणि गोपीचंद(gopichand padalkar) पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत आपण एसटी कर्मचाऱ्यांसोबत अजून मैदानावरच(aazad Maidan) आंदोलनाला बसणार असून इथुन अजिबात हलणार नसल्याचं सांगितलं. कितीही मच्छर चावलं,तरी देखील आम्ही आझाद मैदानावरचा झोपणार आणि एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत, आणि जोपर्यंत राज्य सरकार मान्य करत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वी या दोघांनी देखील माघार घेत एसटी कर्मचाऱ्यांना उघड्यावरच सोडल्याचं पाहायला मिळालं होतं.

गेल्या अनेक वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा अनेक समस्या समोर येताना पाहायला मिळाला आहे देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis) यांचा सरकार असताना देखील एसटी कर्मचाऱ्यांनी ही मागणी लावून धरली होती, मात्र एसटी कर्मचाऱ्यांची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळली होती. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करणं शक्य नसल्याचं त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले. मात्र आता विरोधी पक्षात असताना वेगळी भूमिका घेतल्याने, विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केले आहे.

राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी(amol mitkari)यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सकाळ वेब पोर्टलची बातमी पोस्ट केली असून, त्यांनी हेही वाचा ‘असं’ कॅप्शन दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच एसटी कर्मचाऱ्यांचं वाटोळं केलं असल्याच्या आरोप काही एसटी कर्मचारी संघटनांनी केला आहे,अशी ही बातमी आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले, मात्र आता त्यांच्या नेत्यांना पुळका येतोय, अशी बातमी अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.