महागाईवरून पंतप्रधानांना सवाल उपस्थित करूनही फरक पडत नसेल तर,लोकांनी कुठे जायचं? स्मृती इराणीच कडाडल्या

0

पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीवरून केंद्र सरकारवर विरोधक आणि सर्वसामान्य देखील सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहे. दररोज होणारी इंधन दरवाढ हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. काँग्रेसच्या काळात पेट्रोल ६० रुपये असताना देखील भारतीय जनता पार्टीच्या अनेक बड्या नेत्यांनी रस्त्यावर महागाई विरोधात आंदोलने केली. आता मात्र पेट्रोल शंभर रुपयांपेक्षा अधिक झालं असताही इंधन दरवाढीचे समर्थन करताना हीच लोक पाहायला मिळत असल्याने सोशल मीडियावर ट्रोल देखील होत असल्याचे चित्र आहे.

2014 पूर्वी काँग्रेसचे सरकार असताना भारतीय जनता पार्टी कडून स्मृती इराणी, प्रकाश जावडेकरसह अनेक बडे नेते गॅस सिलेंडर घेऊन इंदर दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करताना देशाने पाहिली आहेत. मात्र आता ही मंडळी देशात पेट्रोलने शंभरी ओलांडली असताना देखील इंधन दरवाढीचे समर्थन करताना पाहायला मिळत आहेत. 2014 पूर्वी इंधन दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरल्याचे या नेतेमंडळींचे जुने व्हिडिओ,फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चार दिवसापूर्वी संजय राऊत यांनी देखील औरंगाबादमध्ये स्मृती इराणीवर यासंदर्भात जोरदार टिका केली होती.

आगामी महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबादमध्ये केंद्र सरकार विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. महागाई विरोधात शिवसेनेने काढलेल्या या मोर्चाला कमालीचा प्रतिसाद देखील मिळाल्यचे पाहायला मिळाले. मोर्चात शिवसैनिकांना संबोधित करताना संजय राऊत यांनी स्मृती इराणी जोरदार हल्ला चढवला. 2014 पूर्वी पेट्रोल ६० रुपये असताना देखील स्मृती इराणी रस्त्यावर सिलेंडर घेऊन नाचत होती, असा एकेरी उल्लेख करत संजय राऊत यांनी स्मृती इराणीवर हल्ला केला होता.

संजय राऊत यांच्यानंतर आता युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बीव्ही श्रीनिवास यांनी स्मृती इराणी यांचे 2014 पूर्वी इंधन दरवाढीविरोधात केलेले एक विधान आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केले असून, कोणी या ‘मोहतरमा’ला का पाहिलं का? असं याला कॅप्शन दिले आहे. बीव्ही श्रीनिवास यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ 2012 मधला असून, स्मृती इराणी या व्हिडिओत पंतप्रधान मनमोहन सिंग यांना महागाई संदर्भात सवाल उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत. आता या व्हिडिओवरून स्मृती इराणी पुन्हा सोशल मीडियावर ट्रोल होताना पाहायला मिळत आहेत.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शंभर दिवसांची मुदत मागितली होती, मात्र शंभर दिवस उलटून गेले तरी देखील, महागाई कमी झाली नसल्याचं, या व्हिडिओत स्मृती इराणी म्हणत आहेत. आम्ही महागाई विरोधात अनेक आंदोलने केली. पंतप्रधानांना महागाई कधी कमी होणार? याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. पंतप्रधानांनी यावर संसदेत शंभर दिवसांची मुदत मागितली, मात्र तरीदेखील महागाई जसीच्या-तशी आहे. जर महागाई कमी होत नसेल तर, लोकांनी देशाच्या पंतप्रधानांवर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल स्मृती इराणी उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.