T20 World Cup: ‘हसन अली’च्या एका चुकीमुळे पाकिस्तानने गमावला टी-ट्वेन्टी विश्वचषक; चाहत्यांनी शिव्या तर घातल्याच पण ‘कॅप्टन’ही म्हणाला..

0

क्रिकेटमध्ये फलंदाजी गोलंदाजीला जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व क्षेत्ररक्षणाला देखील आहे. खराब फलंदाजी गोलंदाजीमुळे अनेक वेळा सामना गमावण्याची वेळ येते. मात्र क्षेत्ररणामुळे देखील महत्वाचा सामना गमावल्याच्या नोंदी इतिहासामध्ये आहेत. 1999 साली झालेल्या सेमी फायनल मॅचमध्ये ‘स्टीव्ह वॉ’चा कॅच आफ्रिकेच्या हर्शेल गिब्सने सोडला आणि वर्ल्ड कप गमावला. याची जाणीव त्याला स्वतः स्टीव्ह वॉने करून दिली होती. काल खेळलेल्या दुसऱ्या सेमी फायनल मॅच मध्ये पाकिस्तानच्या हसन अलीने देखील महत्त्वाच्या वेळी मॅथ्यू वेडचा कॅच सोडला, आणि पाकिस्तानने सामनाच गमावला.

पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करत मोहम्मद रिजवान आणि फकर जमान या दोघांच्या जोरावर 20 षटकात 176 धावांचं मोठं आव्हान ऑस्ट्रेलिया संघासमोर ठेवलं होतं. पाकिस्तानच्या फलंदाजांनी आपली भूमिका चोख पार पाडल्यानंतर, लेफ्ट आर्म स्पेसर शाहिन आफ्रिदीने पहिल्याच षटकात आॅस्ट्रेलियाचा कॅप्टन ‘अॅरोंन फिंच’ला पवेलियनचा रस्ता दाखवत, पाकिस्तान संघाला चांगली सुरुवात करून दिली.

सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी देखील केली. मात्र ही जोडी डोकेदुखी ठरत आहे, असं वाटत असताना शादाब खानने मिचेल मार्शचा पत्ता कट केला. मिचेल मार्श बाद झाल्यानंतर, ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले, आणि पाकिस्तान संघाने या सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली.

दुसरा सेमीफायनल सामना पाकिस्तान संघ सहज जिंकेल असं वाटत असतानाच, ‘वेड’ आणि मार्कस स्टॉइनिस या दोघांचा इरादा काही औरच होता. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या पाच षटकांत 62 धावांची आवश्यकता असताना ही जोडी मैदानात आली. हे दोघेही खेळपट्टीवर नुकतेच आले असल्याने, हा सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकलेला होता. मात्र या दोघांनी पॅनिक न होता खराब चेंडूवर प्रहार आणि चांगल्या चेंडूवर दोन दोन धावा, असं करत सामना पुढे सरकवला.

शेवटच्या बारा चेंडूत 22 धावांची आवश्यकता असताना शहीन आफ्रिदी पाकिस्तान संघासाठी एकोणीसावे षटक घेऊन आला. शाहिन आफ्रिदीने पहिल्या दोन चेंडूत एकच धाव दिली. स्ट्राइक वर डावखुरा ‘मॅथ्यू वेड’ आला,आणि त्याने तीन गगनचुंबी षटकार लावत ऑस्ट्रेलियाला एक हाती सामना जिंकून दिला. या षटकात वेडने जरी तीन षटकार लगावले असले तरी, तिसऱ्या चेंडूवर एक षटकार लावल्यानंतर चौथ्या चेंडूवर त्याचा सोप्पा कॅच सीमारेषेजवळ असणाऱ्या हसन अलीने सोडला. हसन अलीने कॅच सोडल्यानंतर वेडने शेवटच्या दोन चेंडूत सलग दोन षटकार ठोकले. कदाचित जर अलीने झेल टिपला असता,तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.

हसन अलीने कॅच सोडल्यानंतर शोएब मलिकने त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला, प्रेक्षकांनी देखील टाळ्या वाजवून प्रोत्साहित केले. मात्र पाकिस्तानने सामना गमावल्यानंतर हसन अलीला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तान चाहत्यांनी शिव्या घालायला सुरुवात केली, ट्रोल केलं जाऊ लागलं. साखळीतले सर्व सामने जिंकून देखील, पाकिस्तान संघाला काही उपयोग झाला नाही. हसन अलीच्या एका चुकीमुळे आज त्यांना या स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला. फलंदाजी गोलंदाजी बरोबरच क्षेत्ररक्षण देखील तितकचं महत्त्वाचं असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध, झाल्याचे पाहायला मिळाले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.