Sourav Ganguly: वर्ल्डकप नंतर ‘विराट’ची होणार उचलबांगडी; केएल राहुल टी-ट्वेंटी तर रोहित वनडेचा कर्णधार बीसीसीआयने केले स्पष्ट

दोन दिवसांत बीसीसीआयचे अधिकाऱी आणि निवड समितीच्या बैठकीत होणार निर्णय

0

वर्ल्डकप नंतर, 17 नोव्हेंबर पासून न्युझीलड संघाविरुद्ध भारतीय संघ तीन टी-20 सामान्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत अनेक बड्या खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता असून, काही खेळाडूंना डच्चू देखील दिला जाणार असल्याची माहिती मिळते. यात सर्वात पुढे हार्दिक पांड्याचे नाव असून त्याच्यासोबत भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar kumar) देखील या मालिकेतून डच्चू मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.

न्युझीलंड संघासोबत होणाऱ्या तीन टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी विराट कोहली (Virat Kohli) रोहित शर्मासह अनेक बड्या खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार असून, आयपीएलमध्ये स्टार परफॉर्मन्स राहीलेल्या खेळाडूंची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यामध्ये व्यंकटेश अय्यर,शुभमन गिल, संजू सॅमसन,हर्षल पटेल,चहल या खेळाडूंना संधी मिळणार असल्याची शक्यता आहे. या संघाचे नेतृत्व केएल राहुल करणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दुबईमध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा (Indian cricket team) खराब परफार्मन्स राहिल्यामुळे,आता या संघावर साखळीतच गारद होण्याची नामुष्की ओढवली आहे. या विश्वचषकात भारतीय संघाला सुरुवातीला पाकिस्तानने आणि नंतर न्यूझीलडने धूळ चारली. सलग दोन पराभव झाल्यामुळे भारतीय संघाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा आता जवळपास संपुष्टात आल्या आहेत.

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने पुन्हा एकदा आयसीसी स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केली. आणि त्यामुळे पुन्हा एकदा विराट कोहलीच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली जात असून, टी-ट्वेण्टी नंतर आता वनडेचं देखील कर्णधारपद विराट कोहली कडून काढून घेण्यासंबंधी चर्चा सुरू असल्याचं बोललं जातंय. कोहलीच्या कर्णधार पदाविषयी येत्या दोन दिवसांत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शहा (Jay Shah) या दोघांची निवड समिती बरोबर बैठक होणार असल्याची माहिती मिळते.

निवड समिती आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली सचिव जय शहा यांच्यामध्ये होणाऱ्या बैठकीत विराट कोहलीला आगामी काळात कर्णधार पदावर ठेवायचे की, कर्णधार पदावरुन हकालपट्टी करायची यासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. यावर्षी एकदिवसीय सामन्यांचा कोणताही कार्यक्रम भारताकडे नसल्यामुळे कर्णधार बदलण्याची घाई ते करणार नाहीत, हे जरी खरं असलं तरी व्हाइट बॉल क्रिकेटचे दोन वेगवेगळे कर्णधार निवडण्यास बीसीसीआय अनुकूल नाही.

भारतीय संघाला जून २०२२ पर्यंत १७ टी२० सामने आणि केवळ ३ एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. आणि म्हणून भारत केवळ तीन एकदिवसीय सामन्यासाठी व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार नको असल्याचे, बीसीसीआयचे म्हणणे असल्याचे समजते. एवढच नाही तर, व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये कायमस्वरूपी एकच कर्णधार असावा, यावर देखील येत्या दोन दिवसात निवड समिती आणि बीसीसीआयचे पदाधिकारी यांच्यात मीटिंग होणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. जर असं झालं तर विराट कोहली साठी हा खूप मोठा धक्का असेल.

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने अद्याप एकही आयसीसी टूर्नामेंट जिंकलेली नाही. आयसीसी टूर्नामेंटमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाचे खराब प्रदर्शन, राहिल्याने त्याचबरोबर दुसरीकडे कमी कालावधीत रोहित शर्माने आपले नेतृत्व कौशल्य दाखवून दिले असल्याने, कर्णधार पदाची माळ त्याच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एवढचं नाही तर अनेक दि्गजांनी विराटपेक्षा रोहितच बेस्ट कर्णधार असल्याचे म्हटले असल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाले.

क्रिकेटर आणि कर्णधार म्हणून सध्याचा काळ हा विराट कोहलीसाठी फारच वाईट काल असल्याचं दिसून येत आहे. मैदानावर देखील त्याचा कोणताच निर्णय सफल होताना पाहायला मिळत नाही. नाणेफेक पासून ते अंतिम अकरा निवडी पर्यंत विराट कोहली चाहत्यांच्या निशाण्यावर असल्याचे दिसून येत आहे. न्युझीलंड विरुद्ध झालेल्या आपल्या दुसऱ्या सामन्यात चक्क सलामीवीर रोहीत शर्माला नंबर३ वर पाठवल्याने विराट सगळ्याच्याच रडारवर आला होता.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.