Kiran Gosavi: आर्यन खान ‘ड्रग्स’ प्रकरणातलं पहिलं ‘पात्र’ पुणे पोलिसांच्या अटकेत; मुख्य सुत्रधाराचा चेहरा येणार समोर
आर्यन खान ड्रग्स प्रकरणात ‘भन्नाट’ गाजलेलं ‘पात्र’ किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक केली असल्याची बातमी नुकतीच समोर येत असून, आता आर्यन खान ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरेही लवकरच समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2 ऑक्टोंबरला एनसीबीने कार्डिलिया ‘क्रुझवर छापा टाकत आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक केली. आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबीचा कोणताही अधिकारी नसतानाही,समीर गोसावीने आर्यन खानच्या हाताला पकडून,एनसीबीच्या ऑफिसला पळवत नेहल्याने, हे नाव संपूर्ण देशाला माहित पडले.
एवढंच नाही तर एन सी बी चा ऑफिस मधला आर्यन खान सोबत चा एक सेल्फी देखील किरण गोसावी यांनी सोशल मीडियावर शेअर केल्याने खळबळ उडाली होती. त्याचबरोबर एनसीबी कार्यालयात आर्यन खान चा कोणाशी तरी फोनवर बोलणं करून देतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला नंतर किरण गोसावी यांच्या रडारवर आले. त्यातच त्याचां बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी किरण गोसावी यांच्या विरोधात काही धक्कादायक खुलासे केल्याने किरण गोसावी यांच्या अडचणीत वाढ झाली.
या प्रकरणाचा स्वतंत्र साक्षीदार असणारा प्रभाकर साईल यांनी किरण गोसावी आणि सॅम डिसूजा या दोघांमध्ये 25 कोटी रुपयाची चर्चा झाली होती. तर 18 कोटी रुपयांवर हे डील फायनल करून त्यातले आठ कोटी समीर वानखेडे यांना देण्यासंदर्भात बोलणं झाल्याची माहिती प्रभाकर साहिल यांनी एका ॲफिडेव्हिट मार्फत सादर केले होते. त्याचबरोबर या दोघांनी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीला पैशासंदर्भात फोन लावला असल्याची माहितीही या ‘एफीडेविड’मध्ये दिली असल्याने एकच खळबळ उडाली. आणि या प्रकरणाला वेगळे वळण घेतले.
लाखो रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी पुणे पोलिसांनी गेल्या अनेक दिवसांपासून फरार असणारा किरण गोसावीला नुकतीच अटक आहे. किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक केल्यामुळे,आर्यन खान ड्रग्स प्रकरणाशी या किरण गोसावीचा काय संबंध आहे, हे कनेक्शन देखील बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 6 ऑक्टोंबर ला पुणे पोलिसांनी किरण गोसावी यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस काढली होती. ६ ऑक्टोबरपासून पुणे पोलीस किरण गोसावी यांचा शोध घेत होते. मात्र तो सापडत नव्हता अशी माहीती मिळाली आहे.
Kiran Gosavi has been arrested in a 2018 cheating case. A charge-sheet was filed in the case in 2019. If we get more complaints against him, we will register fresh offence against him: Amitabh Gupta, Commissioner of Police, Pune City pic.twitter.com/qkh9tsCFj7
— ANI (@ANI) October 28, 2021
प्रभाकर साईल, यांनी किरण गोसावी,समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या खंडणीच्या आरोपामुळे,एनसीबीने देखील किरण गोसावी यांना चौकशीची नोटीस काढली होती. मात्र तो चौकशीसाठी उपस्थित राहिला नसल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना काल दिली.
आर्यन खान ड्रग्स प्रकरणात ‘किरण गोसावी’ हे नाव देशभर गाजले. कार्डिलिया क्रूजवर छापा टाकण्यापूर्वी २ ऑक्टोबरला सकाळी सॅम डिसूजा आणि किरण गोसावी, हे दोघे एनसीबीच्या कार्यालयात गेले,असल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणात काहीतरी काळंबेरं असल्याचं बोललं गेलं. आपण एनसीबीला कार्डिलिया क्रूजवर पार्टी होणार आहे, याची माहिती देण्यासाठीच गेलो होतो. हे स्वतः किरण गोसावी यांनी यापूर्वीच कबुल केलं आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.