माळशिरस प्रतिनिधी: पिंपरी ग्रामपंचायत पाणी पुरवठा हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून खूप मोठा समस्येचा विषय राहिला आहे. एकीकडे महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायती नागरिकांना रोज अरोचं पाणी वेगळं आणि वापरण्याचं पाणी वेगळं,अशा अनेक सुविधा देत असतात. मात्र पिंपरी ग्रामपंचायत पाणी पुरवठ्याचा विचार केला तर आपल्याला भयान वास्तव पाहिला मिळतं असल्याचं दिसून येत आहे.
पाणी पुरवठ्यासंदर्भात अनेक तक्रारी करून देखील पाणीपुरवठा कधीही सुरळीत होऊ शकला नसल्याच्या घटना,गेल्या काही वर्षात अनेक वेळा घडल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.
‘पिंपरी ग्रामपंचायत’पाणी पुरवठा विभागाकडून,गेल्या दीड महिन्यापूर्वी नागरिकांना आठ ते दहा दिवसानंतर अपुरा पाणीपुरवठा होत होता.
आठ ते दहा दिवसांनंतर अपुऱ्या होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असल्याचं समोर आलं आहे. पिंपरी गावातील शिंदेवस्ती,साईनगर आणि राणबादेववस्ती भागांना पाण्याची खूप मोठी समस्या असल्याचं दिसून येतं.
या तिन्हीं भागातील नागरिकांना ग्रामपंचायत पाणीपुरवठ्या व्यतिरिक्त,इतर कोणताही पाण्याचा सोर्स नसल्याने,लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं असल्याचं चित्र आहे. ग्रामपंचायत पाणीपुरवठा खंडित झाला तर,या भागातील नागरिकांची खूप मोठी पंचाईत होत असल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधी’गणेश गेंड’ यांनी महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना सांगितले.
गेल्या-दीड महिन्यापूर्वी आठ ते दहा दिवसानंतर ग्रामपंचायतीकडून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने प्रभाग क्रमांक३ मधील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. विनंती करून देखील पाणीपुरवठा सुरळीत होईल असे दिसत नसल्याने,स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने तिन्हीं भागातील तीस कुटुंबप्रमुखाच्या सहीचं पत्र मी ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिलं. अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य गणेश गेंड यांनी महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना दिली.
राणबादेववस्ती,साईनगर पन्हाळेमळा,शिंदेवस्ती या भागातील ग्रामस्थ पाठीमागच्या एक-दीड महिन्यांपासून पाणी टंचाईला सामोरे जात आहेत. या विषयी आपणास अनेक ग्रामस्थांनी,सदस्यांनी देखील फोन करून विचारणा केली आहे. मात्र आपण’सरपंच’यांना सांगा असे सांगून मोकळे होत आहात.
आपण प्रशासनाचे एक जबाबदार अधिकारी आहात,मात्र याचा सध्या तुम्हाला विसर पडल्याचे दिसून येते आहे. पाणीपुरवठा सारख्या गंभीर विषयाकडे आपण दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. अशा आशयाचं एक पत्र ग्रामपंचायत सदस्य’गणेश गेंड’ यांनी ग्रामविकास अधिकारी यांना दिलं आहे. या पत्रावर पाणीपट्टी भरत असणाऱ्या 30 कुटुंबप्रमुखांच्या ‘सह्या’देखील असल्याचे दिसून येत आहे.
‘गणेश गेंड’ यांनी ३० कुटुंब प्रमुखाच्या सह्या असणारं पत्र ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिल्यानंतर,पाणीपुरवठा वेळेत सुरळीत झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. ग्रामपंचायत सदस्य’गणेश गेंड’ यांनी केलेल्या या कामाचं अनेकांकडून कौतुक होत असून,सध्या ‘गणेश गेड’ सर्वोत्तम लोकप्रतिनिधी म्हणून समोर येत असल्याचेही बोलले जात आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम