शिवसेना ऊर्मिला मातोंडकर यांना आमदार करणार?
सध्या राज्यपाल नियुक्त पदाच्या 12 जागा रिक्त आहेत. त्या जागा संदर्भातला प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पास झाला आहे. शिवसेनेने मात्र यामध्ये ट्विस्ट आणला आहे कारण अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना आमदार करण्यासाठी शिवसेनेने हालचाली चालू केल्या आहेत. कारण शिवसेनेकडून ऊर्मिला मातोडकर यांच्या नावाची चाचपणी करण्यात आल्याची खबर सूत्रांना मिळाली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 रिक्त राज्यपाल निवृत्त आमदारांच्या पदाचा प्रस्ताव जाहीर झाला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्मिला मातोडकर यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची बातमी सूत्रांना मिळाली आहे. यावरून एक नवा ट्विस्ट राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडणुकीमध्ये आला आहे.
या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीमध्ये असणारी नावे ही कला व सामाजिक क्षेत्रांमधील असावीत असा निकष आहे. ही यादी राज्यपालांकडे सुपूर्त करण्यात आली असून ही नावे राज्यपालांच्या परीक्षेमध्ये पास होणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे ऊर्मिला मातोडकर हे नाव शिवसेनेच्या दृष्टिकोनातून निकषाला ही पात्र ठरेल व कलाक्षेत्रामधून असल्यामुळे शिवसेनेला याचा भविष्यामध्ये फायदा होईल. कारण शिवसेनेला ऊर्मिला यांच्या माध्यमातून कलाक्षेत्रामधील चेहरा मिळणार आहे.
उर्मिला मातोंडकर यांनी गेल्यावर्षी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा भाजपा नेते गोपाल शेट्टी यांच्याकडून पराभव झाला होता. त्यांनी काँग्रेसला राजीनामा देखील दिला आहे. शिवसेना मात्र उर्मिला मातोंडकर यांना आमदारकीची ऑफर देऊन आपल्या पक्षात घेऊ इच्छित आहे. ऊर्मिला मातोडकर यांच्या आमदारकीचे उत्तर आपल्याला येत्या एक-दोन दिवसांमध्ये कळेलच.
राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामधील संघर्ष पाहता मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतलेली नावे राज्यपाल स्वीकारतील का? हादेखील महत्त्वाचा प्रश्न असून राज्यपाल या नावांवर आक्षेप घेतील का? हेदेखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
याबाबत विचारले असता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली की, ” मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नावांना मंजुरी देण्यात आली आहे. यादी राज्यपालांकडे पाठवण्यात येईल व मंत्रिमंडळाने दिलेल्या यादीतील नावे स्वीकारणे हे राज्यपालांचे काम आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम