Dharma Mane vs Gautam mane: बाळूमामाचा वारकरी होणार जिल्हा परिषदेचा मानकरी? धर्मा माने समोर गौतम मानेंचे तगडे आव्हान

0

Dharma Mane vs Gautam mane: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर अनेकांचे लक्ष माळशिरस (malshiras) तालुक्याकडे लागले आहे. माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेक लढती प्रतिष्ठित आहेत, त्यापैकीच एक प्रतिष्ठेची लढत म्हणजे धर्मा माने (Dharma Mane) आणि गौतम माने. (Gautam mane)

पाच तारखेला मतदान होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी (BJP)आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCPSP) हे दोन पक्ष आमने सामने आहेत. माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील (mohite Patil) आणि उत्तम जानकर (uttam jankar) या दोघांची मोठी ताकद असल्याने भाजपसाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मोठे आव्हान आहे. तालुक्यामध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राम सातपुते Ram (satpute) शर्तीचे प्रयत्न करत असले तरी अजूनही त्यांना मोहिते पाटलांच्या ताकतीचा अंदाज आलेला नाही. लोकसभा त्यानंतर विधानसभा आणि परत नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोहिते पाटलांनी राम सातपुतेंचा दारुण पराभव केला.

पराभवाच्या हॅट्रिक नंतर माजी आमदार राम सातपुते आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आपले नशीब आजमावून पाहत आहेत. मात्र या निवडणुकीतही मोहिते पाटलांचे पारडे जड असल्याचे पाहायला मिळत असून, पुन्हा एकदा राम सातपुते यांचा मोठा पराभव होण्याचे चित्र तालुक्यामध्ये असल्याचे दिसून येत आहे.

धर्मा माने आणि गौतम माने यांच्या लढतीची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मांडवे जिल्हा परिषद गटातून कण्हेर गावचे धर्मा माने आणि गौतम माने एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत. धर्मा माने भाजप तर गौतम माने राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत.

या गटामध्ये धनगर समाज मोठ्या संख्येने असल्यामुळे दोन्हीं उमेदवार धनगर समाजाचेच आहेत. संत बाळूमामाला धनगर समाजात विशेष महत्त्व आहे. गौतम मानेंची बाळूमामावर मोठी श्रद्धा आहे. त्यामुळे बाळूमामाचा वारकरी जिल्हा परिषदेचा सदस्य होणार का याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे.

गौतम माने यांच्यासाठी जमेची बाजू म्हणजे आमदार उत्तम जानकर आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील या दोन्ही नेत्यांच्या एकत्रित ताकतीपुढे राम सातपुतेचा टिकाव लागणार नसल्याचं बोललं जात आहे. याशिवाय गौतम माने यांचा दांडगा जनसंपर्क ही देखील त्यांची एक जमेची बाजू असल्याचं बोललं जातं. अनेक गावांमध्ये गौतम माने यांची क्रेझ असल्याचे दिसून येते. एकूणच सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, गौतम माने मोठ्या फरकाने विजय संपादित करू शकतील असं चित्र तालुक्यात असल्याचे पाहायला मिळते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.