Virat Kohli : त्या कारणामुळे एअरपोर्टवर विराट कोहलीने महिलेला जोरदार फटकारले; व्हिडिओ तुफान व्हायरल..
Virat Kohli: सध्या भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. यामधील पहिला कसोटी सामना भारतीय संघाने, तर दुसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला आहे. तिसरा कसोटी सामना ड्रा झाला असून, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने आता उर्वरित दोन कसोटी सामान्यांना अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
मात्र या सगळ्यांपेक्षा सध्या चर्चेत आला आहे तो विराट कोहली. चौथा कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय संघ मेलबर्नला रवाना झाला आहे. मेलबर्नला (Melbourne) पोहचत असताना एअरपोर्टवर विराट कोहली आणि ऑस्ट्रेलिया महिला (virat kohli Australia media) पत्रकार यांच्यामध्ये चांगलाच वाद झाल्याचं पाहायला मिळाले.
तसे पाहिले गेले तर विराट कोहली नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतो. तो आपल्या तापट स्वभावासाठी देखील प्रसिद्ध आहे. मात्र अलीकडे त्याचा हा स्वभाव फारसा चाहत्यांना पाहायला मिळत नाही. परंतु आता तो पून्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच झालं असं, विराट कोहली मेलबर्नला रवाना होत असताना त्याच्या मुलांचा फोटो एका ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरने काढला.
आपल्या मुलांचा फोटो महिला पत्रकारांनी काढल्याने, विराट चांगलाच संतापला. महिला पत्रकाराशी बोलताना विराट कोहली म्हणाला, तुम्ही माझ्या परवानगी शिवाय माझ्या कुटुंबाचे फोटो काढू शकत नाही. विराट कोहली बऱ्याच वेळ महिला पत्रकाराशी चर्चा करत असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. मात्र चॅनल 7 या मीडिया हाऊसने आम्ही कोणताही फोटो किंवा व्हिडीओ काढला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
https://x.com/7NewsMelbourne/status/1869649540560920593?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1869649540560920593%7Ctwgr%5Ea5576b664475efb0abb73526e01bec507bc693ed%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-1939196557988136077.ampproject.net%2F2410292120000%2Fframe.html
ऑस्ट्रेलिया मीडिया आणि विराट कोहली यांचे नाते फारसे खास नाही. यापूर्वी देखील ऑस्ट्रेलिया मीडिया सोबत विराट कोहलीचा वाद झालेला आहे. या दौऱ्यापूर्वी मात्र ऑस्ट्रेलिया माध्यमांनी विराट कोहलीचे चांगलेच कौतुक केले होते. चौथा आणि बॉक्सिंग डे कसोटी समाना मेलबर्न क्रिकेट मैदानावर 26 डिसेंबर पासून सुरू अनेकांचं लक्ष आता विराट कोहलीच्या फलंदाजिकडे लागले आहे.
हे देखील वाचा Pushpa 2 The Rule : गंडलाय तरीही का करतोय बक्कळ कमाई; काय असेल pushpa 3 मध्ये..
Ladki Bahin Yojana: आता लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या पाच अटींची करावी लागणार पूर्तता..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम