Vidhansabha 2024: माळशिरसची जबाबदारी मोहिते पाटलांवर; सातपुते, जाणकरांचा होणार पद्धतशीर कार्यक्रम..?
Vidhansabha 2024: लोकसभेत (Loksabha ) भारतीय जनता पार्टीला (BJP) मोठा फटका बसला. खास करून भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभेनंतर आता विधानसभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. अशातच आता भारतीय जनता पार्टीनेही सावध पावले टाकायला सुरुवात केली आहे. कुठल्याही निवडणुकीत भाजप पूर्ण ताकत आणि रणनीती नुसार मैदानात उतरत असते. माळशिरस विधानसभेसाठी देखील भारतीय जनता पार्टीने रणनीती आखली आहे.
Mazi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या अटीत तीन मोठे बदल; आता असा करता येणार अर्ज..
रणजीत निंबाळकर आणि राम सातपुते या दोन्ही उमेदवारांवर मोहिते पाटील प्रचंड नाराज होते. आपली नाराजी त्यांनी उघडपणे बोलून देखील दाखवली होती. साहजिकच भाजपने यावर वेळीच तोडगा न काढल्याने धैर्यशील मोहिते पाटलांनी महाविकास आघाडीत प्रवेश केला. आणि भाजपला पराभवाची धूळ चारत खासदार पदाची शपथही घेतली. साहजिकच माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांची ताकद लक्षात घेऊन, आता भारतीय जनता पार्टीने देखील सावध पावले टाकायला सुरुवात केली आहे.
लोकसभेदरम्यान मांडव्यात झालेल्या एका सभेत राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्यावर जहरी टीका केली होती. गेल्या पन्नास वर्षात विकास झाला नाही, तो विकास मी या तालुक्यात केल्याचं विधान सातपुते यांनी केलं होतं. साहजिकच त्यांचे हे वाक्य मोहिते पाटील यांचा चांगलेच जिव्हारी लागलं होतं. तालुक्याच्या राजकारणापासून आपल्याला बाजूला केलं जात असल्याचं लक्षात आल्यानंतर, मोहिते पाटील देखील चांगलेच आक्रमक झाले.
दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटलांनी बीडचं पार्सल बिडला पाठवणार असल्याचा चंगच बांधला होता. लोकसभेत त्यांचा दारुण पराभवही झाला. लोकसभा निवडणुकीत राम सातपुते यांचा पराभव झाल्यानंतर, ते पुन्हा माळशिरस विधानसभा लढवणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र यामध्ये आता नवा ट्विस्ट आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पार्टीने माळशिरस विधानसभेची जबाबदारी रणजीत सिंह मोहिते पाटील यांच्यावर सोपवली आहे. तुम्हाला हवा तो उमेदवार द्या, मात्र माळशिरसची जागा भारतीय जनता पार्टीकडे राहिली पाहिजे. अशा सूचना भारतीय जनता पार्टी कडून देण्यात आली आहे.
रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी देखील माळशिरसची जागा जिंकायची असेल, तर राम सातपुते उमेदवार चालणार नाही. असं वरिष्ठांना कळवल्याचं समजतं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पार्टीने देखील रणजीतसिंह मोहिते-पाटलांच्या विचारावर सहमती दर्शवली आहे. त्यामुळे मोहिते पाटलांना आव्हान देणाऱ्या राम सातपुतेंच्या राजकीय करिअरला खीळ बसण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचं बोललं जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राम सातपुते यांना फलटण विधानसभेचे तिकीट देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून यापूर्वीच माळशिरस विधानसभेचा उमेदवार जाहीर केला गेला आहे. उत्तमराव जानकर महाविकास आघाडीकडून विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. मात्र असं असलं तरी उत्तमराव जानकरांचाही मोहिते पाटील करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
राम सातपुतेप्रमाणे, उत्तमराव जानकर हे देखील मोहिते पाटलांच्या राजकारणाला भविष्यात आव्हान देऊ शकतात. तालुक्यात आपल्यापेक्षा मोठा नेता होऊ नये, याची पुरेपूर काळजी मोहिते पाटील कुटुंबीय घेत असल्याची माहिती आहे. भविष्यात उत्तम जानकर आपल्यासाठी आव्हान ठरू शकतात, साहजिकच यामुळे मोहिते पाटील उत्तमराव जानकर यांचा देखील करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीत असल्याची महिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून माळशिरस विधानसभा निवडणूक दिवंगत आमदार हनुमंत डोळस यांचे चिरंजीव, संकल्प डोळस लढवणार असल्याची माहिती आहे.
हे देखील वाचा सहकार महर्षी म्हणून महाराष्ट्राला ओळख करून देणारे शंकरराव मोहिते-पाटील इंदिरा गांधींनाही भिडले होते..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम