Rohit Sharma BCCI meeting: रोहित शर्माचा BCCI ला सवाल, अन् हार्दिक पांड्या पुन्हा अडचणी..

0

Rohit Sharma BCCI meeting: विश्वचषकानंतर भारतीय सीनियर खेळाडूंनी क्रिकेट पासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने विश्वचषकात दमदार कामगिरी केली. मात्र फायनलमध्ये अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. फायनलमध्ये भारतीय संघाचा पराभव होऊन देखील भारतीय संघाने केलेल्या कामगिरीचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं. रोहित शर्माने ज्या पद्धतीने भारतीय संघाला सुरुवात करून दिली, त्या अप्रोचची देखील मोठी चर्चा झाली.

वनडे विश्वचषकात पराभव झाल्यानंतर, भारतीय संघाला टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. (T20 World Cup 2024) 2024 मध्ये होणाऱ्या T 20 विश्वचषकासाठी भारतीय संघाने आता कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ऐवजी रोहित शर्मावर (Rohit Sharma) शिक्कामोर्तब केले आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची रोहित शर्मा बरोबर केलेल्या मीटिंगमध्ये हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषकामध्ये हार्दिक पांड्याला दुखापत झाली. या दुखापती नंतर टी-ट्वेंटी विश्वचषकापर्यंत हार्दिक पांड्या एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळणार नाही. त्यामुळे बीसीसीआय हार्दिक पांड्याला कर्णधार बनवून अतिरिक्त रिस्क घेणार नाही. रोहित शर्मा बरोबर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या मीटिंगमध्ये देखील याविषयी चर्चा झाली आहे.

या मीटिंगमध्ये रोहित शर्माने मला टी-ट्वेन्टी क्रिकेट विषयी स्पष्ट माहिती द्या. टी-ट्वेन्टी क्रिकेट संघात माझा काय रोल असेल, याविषयी देखील मला अधिक स्पष्टता आताच हवी. जर तुम्ही आगामी t20 विश्वचषकासाठी मला कर्णधार म्हणून पाहू इच्छित असाल, तर याविषयी देखील मला स्पष्टता हवी. रोहित शर्माने उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे आता हार्दिक पांड्याचे टी ट्वेंटी कर्णधार पद धोक्यात आले आहे.

मुंबई इंडियन्सने कर्णधार पद नाकारल्यानंतर हार्दिक पांड्याने मुंबईला सोडण्याचा निर्णय घेतला. आणि तो गुजरात टायटन संघात सामील झाला. दोन सीजन गुजरात कडून खेळल्यानंतर हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद देण्यात येईल अशी खात्री दिली. अंबानीने खात्री दिल्यानंतर तो पुन्हा तो मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. परंतु आता रोहित शर्मा हाच आगामी आयपीएल सीझनमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद भूषवणार आहे.

हार्दिक पांड्याने रोहित शर्माला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र हार्दिक पांड्या स्वतःच अडचणीत आला आहे. आता तो पुढच्या आयपीएल सीझनमध्ये कोणत्याही संघाचे कर्णधार पद भूषवताना दिसणार नाही. याशिवाय तो भारतीय टी-ट्वेंटी संघाचे नेतृत्व करतानाही दिसणार नाही. एवढंच नाही, तर तो भारतीय टी ट्वेंटी विश्वचषक संघाचे प्रतिनिधित्व देखील करेल की नाही, याविषयी देखील प्रश्नचिन्ह आहे.

हे देखील वाचा T20 World Cup: रोहित शर्माच्या कर्णधार पदाला आव्हान दिले; आता तोच T-20 World Cup मधून आउट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.