Kiara Advani: कियारा अडवाणीही आलिया प्रमाणे लग्नापूर्वीच प्रेग्नेंट; व्हिडिओ आला समोर..

0

Kiara Advani: बॉलीवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Kiara Advani and Sidharth Malhotra) या दोघांनी सात फेब्रुवारीला राजस्थान !rajsthan) मधील जेसलमेर या ठिकाणी शाही विवाह केला. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्न गाठ बांधल्यानंतर, सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव झाला. कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाबरोबरच (Kiara Advani Sidharth Malhotra marriage) चाहत्यांना आता आणखी एक गुड न्यूज मिळाली आहे. आलिया भट्ट (Alia Bhatt) प्रमाणेच कियार अडवाणी देखील गरोदर असल्याचं एका व्हिडिओतून समोर आलं आहे.

गेल्या काही वर्षांपासून कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकमेकांना डेट करत होते. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने या दोघांच्या लग्नाबाबत चर्चा बॉलीवूडमध्ये रंगत असल्याचं पाहायला मिळत होतं. अखेर सात फेब्रुवारीला या दोघांनी राजेशाही थाटामध्ये आपली लग्न गाठ बांधली. या दोघांचे लग्न पार पडल्यानंतर, आपल्या सोशल अकाऊंट वरून सिद्धार्थ मल्होत्राने लग्नाचे फोटो पोस्ट केले. लग्नानंतर, या दोघांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान वायरल झाले आहेत.

जैसलमेर मधील सूर्यगढ पॅलेसमध्ये दोघांनी आपली लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे, हे लग्न तब्बल तीन दिवस चालले. लग्नापूर्वी तीन दिवस अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते. या पॅलेसमध्ये पाहुणे मंडळींसाठी तब्बल 80 रूम बुकिंग केल्या होत्या. या पॅलेसचे भाडे दिवसाला तब्बल तीन कोटी असल्याचे देखील आता समोर आलं आहे. करण जोहरसह अनेकांनी कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत.

एकीकडे अनेकांनी या दोघांना महागड्या भेटवस्तू दिल्याने मीडियावर याची चर्चा होत असतानाच दुसरीकडे आलिया प्रमाणेच कियारा अडवाणी देखील प्रेग्नेंट असल्याची चर्चा रंगली असल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भातला दोघांचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे. लग्नानंतर दोन दिवसांनी दोघेही एका गाडीतून उतरले.

यामध्ये सिद्धार्थने ब्लू जीन्स, पांढरा टी शर्ट आणि काळे जॅकेट परिधान केले आहे. तर कियारा अडवाणीने ब्लॅक रंगाचा टी शर्ट आणि पँट परिधान केली आहे. मात्र कियारा अडवाणीने अंगाभोवती एक स्कार्फ गुंडळल्याने ती गरोदर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या. या व्हिडिओत कियारा सतत पोटाला हात लावत असल्याने देखील या चर्चांना उधाण आले आहे. या व्हिडिओ खाली चाहत्यांनी कमेंट करताना कियारा देखील आलिया भट्ट प्रमाणे लग्नाअगोदर गरोदर असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भातली अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र कियारा प्रेग्नेंट असण्याची शक्यता काही माध्यमांनी वर्तवली आहे.

हे देखील वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.