Railway Bharti: भारतीय रेल्वेत 4 हजाराहून अधिक पदांची मेगा भरती; दहावीसह या उमेदवारांना संधी..
Railway Bharti: महागाईच्या (inflation) या जमान्यात नोकरी (nokari) असणं फार आवश्यक आहे. उच्च शिक्षण घेऊन नोकरी लागेल, याची कोणतीच शास्वती राहिलं नाही. साहजिकच यामुळे आता दहावी बारावी नंतर नोकरी शोधताना पाहायला मिळतो. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल, तर तुमचा शोध याठिकाणी पूर्ण होणार आहे. जर तुमचे शिक्षण दहावी पूर्ण असेल, त्याचबरोबर तुम्ही आयटीआय उत्तीर्ण असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.
भारतीय रेल्वे विभागात (Indian Railway Division) अप्रेंटिस (apprentice) या पदासाठी दक्षिण मध्य रेल्वेत 4103 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छूक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख 29 जानेवारी ठेवण्यात आली आहे. कोण-कोणत्या विभागात किती जागा आहेत, त्याचबरोबर उमेदवारांची कोणत्या जागेसाठी काय शैक्षणिक पात्रता असणार आहे? जाणून घेऊया सविस्तर.
भारतीय रेल्वे विभागात भरण्यात येणाऱ्या 4103 रिक्त जागांसाठी ‘AC मॅकेनिक’ या पदासाठी एकूण 250 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. कारपेंटर या पदासाठी एकूण 18 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘डिझेल मेकॅनिक’ या पदासाठी 531 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘इलेक्ट्रिशियन’ या पदासाठी एकूण 1019 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक’ या पदासाठी 92 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘फिटर’ या पदासाठी 1460 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
‘मशीनिस्ट’ या पदासाठी 71 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. MMTM या पदासाठी एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “MMW” या पदासाठी एकूण 24 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘पेंटर” या पदासाठी एकूण 80 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. “वेल्डर” या पदासाठी एकूण 553 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. आता आपण उमेदवाराची “शैक्षणिक पात्रता” आणि वयोमर्यादा काय निश्चित करण्यात आली आहे, हे देखील जाणून घेऊ.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
भारतीय रेल्वे विभागात “अप्रेंटिस” या पदासाठी 4103 रिक्त जागांसाठी करण्यात येणाऱ्या या भरतीसाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून 55% गुणासह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच त्याने “आयटीआय” हा ट्रेन देखील पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. उमेदवारांच्या वयोमर्यादेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवारांचे वय हे 30 डिसेंबर २०२२ रोजी 15 ते 24 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर एससी आणि एसटी उमेदवारांसाठी पाच वर्ष अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. सोबतच ओबीसी उमेदवारांना तीन वर्ष अधिक सूट दिली जाणार आहे. भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना नोकरीचे ठिकाण “दक्षिण मध्य रेल्वेचे युनिट” देण्यात येणार आहे. आता आपण उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याविषयी देखील सविस्तर जाणून घेऊ.
ऑनलाईन अर्ज
भारतीय रेल्वे विभागा अंतर्गत केल्या जाणाऱ्या या भरतीसाठी उमेदवारांना 29 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाइल मधील क्रोमवर जाऊन http://34.93.184.238/instructions.php असं सर्च करणे आवश्यक आहे. त्यांनतर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. जर तुम्हाला या भरतीची जाहिरात पाहायची असेल, तर यावर क्लिक करा.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम