Satara: ‘हे’ फक्त छत्रपतींचा वारसा असणाऱ्या राजधानी साताऱ्यात होऊ शकतं; ‘शाहरुख’ यांचं होतंय सर्व स्तरातून कौतुक
सातारा प्रतिनिधी: छत्रपतीचा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या राजधानी साताऱ्याची भुरळ अनेकांना पडल्याचे आपण नेहमी पाहतो. कास पठाराचे सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून पर्यटन येत असतात. सातारकरांची बोलण्याची एक वेगळी शैली असल्याने याचीही भूरळ अनेकांना पडते. सातारकर बोलताना उद्धट वाटत असला तरी, आतून तो खूप प्रेमळ आणि मवाळ असल्याचेही दिसून येतं. आपल्या ईमानाशी प्रामाणिक असणाऱ्यांची मोठी संख्या साताऱ्यात आपल्याला पाहायला मिळते. काल सातारामध्ये घडलेली एक घटना आपण पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला सातारकरांचा अभिमान तर वाटेलच मात्र तुम्ही कौतुक करताना थकणारही नाही.
साताऱ्याच्या शाहरुख बागबान या रिक्षाचालकाच्या ‘गूगल’पेवर एका तरुणीने पस्तीस हजार पाठले होते. हे पैसे नजरचुकीने आल्याचे समजल्यानंतर, ‘शाहरुख बागवान’ यांनी ३५ हजार परत करत माणुसकीचे दर्शन घडवले आहे. ‘शाहरुख बागबान’ या रिक्षाचालकाचे आता सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांनी साताऱ्याची मान उंचवण्याचं बोललं जातंय.
माळशिरस तालुक्यातील नातेपुते या गावची ‘पूनम ढोबळे’ या तरुणीने दिवाळी जवळ आल्यामुळे, आपल्या आईच्या ‘गूगल’पेवर ३५ हजार रुपये पाठवले. संध्याकाळी ती जेव्हा ऑफिसमधून घरी गेली. पाठवलेले पैसे आईच्या गूगलपेवर आले की नाही याची खात्री केल्यानंतर तिला समजलं, पाठवलेले पैसे आईला मिळालेच नाहीत. तिने लगेच ‘गूगल’पेचेक केले, आणि तिला धक्काच बसला.
काही महिन्यांपूर्वी नोकरीनिमित्त पुनम सातारा या ठिकाणी राहत होती. कधी काळी तिने शाहरुख बागबान या रिक्षाचालकाच्या रिक्षामधून प्रवास केला होता. या रिक्षाचे झालेले पैसे ‘तिने’ गुगलपेद्वारे पेड केले होते. आणि यामुळेच तिची पैसे पाठवण्यात गफलत झाली. पुनमच्या आईचे नाव ‘सुरेखा’ आहे. पैसे पाठवताना चुकून तिने सुरेखा ऐवजी शाहरुख हे नाव सेलेक्ट केलं, आणि ऑफिसच्या घाई गडबडीत पैसेही सेंड केले.
संध्याकाळी पूनम जेव्हा ती घरी आली, तेव्हा तिला समजलं आपण पाठवलेले पैसे आपल्या आईच्या नावावर न जाता, आपण एकदा प्रवास केलेल्या रिक्षाचालक ‘शाहरुख बागबान’ या व्यक्तीच्या नावे गेले आहेत. ही फार मोठी चूक पूनामच्या लक्षात आल्यानंतर, तिला धक्काच बसला. तिने घाबरत घाबरत शाहरुख या रिक्षाचालकांना फोन लावला. आणि झालेली चूक सांगितली.
शाहरुख बागबान या रिक्षाचालकांनी मी लगेच चेक करून सांगतो असे सांगितल. पैसे आले असल्याचे त्यांनी पुनमला सांगितले. मी दिवसभर कामात असल्यामुळे मोबाईल चेक केला नसल्याचे त्यांनी सांगितले. काही काळजी करू नका म्हणून, शाहरुख बागबान या रिक्षाचालकांनी पूनामच्या ‘गूगल’पेवर लगेच ३५ हजार रुपये पाठवले. या रिक्षाचालकांना आता संपूर्ण साताऱ्यातून कौतुकाचे फोन येत आहेत.
तुम्ही तुमच्या आईला पस्तीस हजार रुपये पाठवले, याचे महत्त्व मला माहिती आहे. कारण माझी आई आजारी असते, तिच्यासाठी मी कशी ॲडजस्टमेंट करतो, याची मला जाणीव आहे. पैशाचे महत्त्व मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे इतरांच्या पैशावर नजर ठेवणे, हे माझ्याकडून कधीही होऊ शकत नाही. असं शाहरुख बागवान यांनी महाराष्ट्र लोकशाहीशी बोलताना सांगितले.
काल छत्रपतींच्या साताऱ्यात सर्वाना अभिमान वाटेल अशी घटना घडली. चूकून माळशिरस तालुक्यातील पूनम ढोबळे या तरूणीचे ३५ हजार रुपये शाहरुख बागवान या रिक्षाचालकांच्या 'गूगल'पेवर गेले. मात्र हे रिक्षाचालकांच्या लक्षात आल्यानंतर लगेच ते त्यांनी परतही केलं.#rajdhani_satara #shahrukh pic.twitter.com/pTjsy1hKk7
— महाराष्ट्र लोकशाही (@MahaLokshahi) October 29, 2021
कोरोच्या काळात आपण पाहतोय, अनेक जण बेरोजगार झाले. अनेकांचे धंदे बुडाले, यात सगळ्यात मोठा फटका रिक्षाचालकांना बसला. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. कोरोणाच्या काळात रिक्षा चालकांचासमोर जगण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला होता. अशा परिस्थितीत एखाद्याच्या अकाउंटवर जर पैसे आले तर, तो परत करेल की नाही? हे ठामपणे सांगता येणार नाही. बहुतेकदा तो परत करणारही नाही. मात्र शाहरुख बागवान हे रिक्षा चालक जगात भारी आहेत. त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे संपूर्ण सातारकराची मान अभिमानाने उंचावली आहे. आज त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळत आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.