Cyrus Mistry Accident: सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन, व्हिडीओ व्हायरल; जाणून घेऊया प्रवास..
Cyrus Mistry Accident:टाटा सन्सचे (Tata Sons) माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं आज पालघर येते अपघाती निधन झाले आहे. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या भीषण अपघातात टाटा सन्सचे सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, मिस्त्री यांचा जागीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. दुपारच्या सुमारास पालघर मधील सूर्या नदीवरील पुलावर दुभाजकाला (Devider) कार धडकल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. या अपघातात अजून दोघेजण जखमी असून त्यांना तातडीने गुजरात येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत.
दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद (Ahmedabad) येथून मुंबईला (Mumbai) जाणाऱ्या मार्गावर सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात घडला आहे. या भीषण अपघातामध्ये दोनजण जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. सायरस मिस्त्री ज्या कारमधून प्रवास करत होते, ती मर्सिडीज कार होती. त्या मर्सिडीज गाडीचा क्रमांक MH-47-AB-6705 असा आहे. अशी माहिती पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना दिली आहे. सायरस मिस्त्री यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली देत, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एक ट्विट केले आहे. टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री जी यांचे पालघर, महाराष्ट्राजवळ झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाल्याबद्दल कळून खूप दुःख झाले. त्यांच्या कुटुंबीयांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. ओम शांती. असे ट्विट नितीन गडकरी यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करून सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भयंकर बातमी माझा भाऊ सायरस मिस्त्री यांचे निधन झाल्याच्या घटनेवर विश्वासच बसत नाही. भावपूर्ण श्रद्धांजली सायरस! अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत
सायरस मिस्त्री यांचा जन्म ४ जुलै १९६८ रोजी पारसी कुटुंबात झाला. त्यांनी टाटा ग्रुपचे चेअरमन म्हणून देखील काम केले आहे. त्यांचे इंजिनियरींग पर्यंतचे शिक्षण इम्परिकल लंडन कॉलेज, तसेच पुढील शिक्षण लंडन बिझनेस कॉलेज या ठिकाणी झाले. सायरस मिस्त्री यांचे व्यावसायिक पदार्पण वयाच्या २३ व्या वर्षी 1991 मध्ये झाले. शापूरजी पालोनजी अँड कंपनी लिमिटेड या कौटुंबिक बांधकाम कंपनीत संचालक म्हणून मिस्त्री यांना कारभार देण्यात आला.
सायरस मिस्त्री यांच्या सायरस इनवेस्टमेंट प्रा. लि. कंपनीचा टाटा समूहात 18.4 टक्के वाटा आहे. अवहालानुसार सायरस मिस्त्री यांची एकूण संपत्ती 15 बिलियन डॉलर्स एवढी आहे. ते राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे सदस्य देखील होते. सायरस मिस्त्री आपल्या वडिलांच्या निवृत्तीनंतर एक वर्षभराने 1 सप्टेंबर 2006 रोजी टाटा सन्सच्या संचालक मंडळात सामील झाले. 24 सप्टेंबर 1990 ते 26 ऑक्टोबर 2009 या 19 वर्षांच्या कालखंडात टाटा एलक्सी (Tata Elexy) लिमिटेडचे संचालक म्हणून काम केले आणि 18 सप्टेंबर 2006 पर्यंत ते टाटा पॉवर (Tata Power) कंपनी लिमिटेडचे संचालक म्हणून त्यांनी कामकाज पाहिले आहे.
2013 मध्ये मिस्त्री यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय, ते टाटा इंडस्ट्रीज, टाटा स्टील (Tata Steel), टाटा मोटर्स (Tata Motors), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services), टाटा पॉवर (Tata Power), टाटा टेलिसर्व्हिसेस (Tata Teleservices), इंडियन हॉटेल्स (Indian Hotels), टाटा ग्लोबल बेव्हरेजेस (Tata Global Beverage) आणि टाटा केमिकल्ससह (Tata Chemicals) सर्व प्रमुख टाटा कंपन्यांचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज पाहिले आहे. परंतु टाटा सन्स बोर्डाने 24 ऑक्टोबर 2016 रोजी सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी मतदान केले. त्यामुळे त्यांना अध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागले.
#CyrusMistry, former Chairman of #TataSons, while travelling from Ahmedabad to Mumbai, died in a road accident after his car hit a divider. 4 people were present in the car; 2 died on spot & 2 were moved to hospital: Palghar police officials pic.twitter.com/ExLJFZ8TH7
— The Times Of India (@timesofindia) September 4, 2022
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम