ओ माय गॉड! नवाब मलिक वेश्याव्यवसाय चालवायचे; ईडीकडे पुरावे..,”

0

महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल भल्या पहाटे चौकशीसाठी ईडी कार्यालयात पकडून नेण्यात आलं. आणि आठ तास चौकशी केल्यानंतर अखेर अटक केली. सक्तवसुली संचालनालयाने आर्थिक मनी लॉन्ड्रिंग म्हणजेच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांना अटक केली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर आता राजकारण चांगलेच तापले असून, नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून नावाब मलिक सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या अनेक बड्या नेत्यांवर विविध आरोप करत होते. आणि त्यामुळेच त्यांच्यावर ही सूडबुद्धीने झालेली कारवाई असल्याचे, एकीकडे राष्ट्रवादीने म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे विरोधक नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत असून, रस्त्यावर देखील उतरल्याचं पाहायला मिळत आहे. नवाब मलिक सध्या आठ दिवसांच्या ईडी कोठडीमध्ये आहेत.

नवाब मालिक यांना आता आठ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली असली तरी देखील, दुसरीकडे भारतीय जनता पार्टीची अनेक लोकं नवाब मलिक यांच्यावर विविध आरोप करताना देखील पाहायला मिळत आहेत. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात नवाब मलिक यांनी आरोप केलेल्या मोहित कंबोज यांनी देखील आता नवाब मलिक यांच्यावर एक खळबळजनक आरोप केला आहे.

भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी मलिक यांच्यावर एक धक्कादायक आरोप करताना म्हटले आहे. नवाब मलिक पूर्वी डान्सबार चालवायचे, एवढंच नाही तर बांगलादेशी मुलींना मोहित कंबोज म्हणालेत. मलिक यांनी बांगलादेशातून मुली आणून, भारतात वेश्या व्यवसायामध्ये ढकलत होते. असा गंभीर आरोप कंबोज यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांच्यावर केला आहे.

मोहित कंबोज यांनी फक्त आरोपच नाही तर, आम्ही या संदर्भात स्टिंग ऑपरेशन देखील केलं असल्याचं, मोहित कंबोज यांनी या पत्रकार परिषदेत म्हटल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनेक मुलींनी नवाब मलिक यांनी आम्हाला बळजबरीने या वेश्याव्यवसायात अडकवल्याची कबुली दिली असल्याचंही त्यांनी म्हंटले असून, या संदर्भात मी तपास यंत्रणांकडे पुरावे देणार असल्याचं कंबोज यांनी म्हटलं आहे.

या पत्रकार परिषदेत बोलताना, मोहित कंबोज म्हणाले, नवाब मलिक यांचे कारनामे या लोकांना माहीत होते, मात्र पूर्वी कुरल्यातील माणसं नवाब मलिक यांना घाबरायचे. म्हणून ते कुठे काही बोलले नाहीत. वेश्या व्यवसाय, ड्रग्ज पेडलिंग, त्याचबरोबर देशाविरोधी हे प्रकरण असल्याचं म्हणत, मोहीत कंम्बोज यांनी मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.