महाविकास आघाडी सरकार ‘बुळं’ आहे काय? दिग्गजांच्या संतप्त सवालानंतर पवार आक्रमक म्हणाले..,”
राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित एका मनी लाँण्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांची चौकशी सुरू असून, विशेष सत्र न्यायालयाने नवाब मलिक यांना आठ दिवसांची कोठडी देखील सुनावली आहे. चौकशी संपल्यानंतर ईडी कार्यालयातून बाहेर येताच नावाब मलिक यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हात केला.
चौकशी संपल्यानंतर कोर्टात जात असताना नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना “लढेंगे जितेंगे एक्सपोज करेंगे” म्हणत ईडीला आणि भाजपला एक प्रकारे आव्हानच दिलं होतं, मात्र आता त्यांना आठ दिवसांची कोठडी सुनावली असल्यामुळे, त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे. विशेष सत्र न्यायालयाला ईडीने नवाब मलिक यांना चौदा दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी न देता आठ दिवसांची कोठडी दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जाणूनबुजून टार्गेट केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. जी लोकं भाजपवर आणि केंद्राच्या नेत्यांवर टीका करतील, त्यांच्यावर अशाच प्रकारे दबावतंत्र टाकलं जाईल, असे अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. एकीकडे भाजपवर हे आरोप होत असताना दुसरीकडे राजू परुळेकर यांनी मात्र महाविकास आघाडी सरकार बुळं असल्याचं म्हटले आहे.
फॅसिझम विरोधात लढण्यासाठी तुम्हाला सॉफ्ट कॉर्नर घेऊन कधीही जुळणार नाही. या लोकांना टक्कर द्यायची असेल तर तुम्हाला तेवढ्याच आक्रमकतेने त्यांच्यावर हल्ला करावा लागेल. आज या लोकांनी नवाब मलिक यांना टार्गेट केलं असलं तरी, उद्या ही लोकं मुख्यमंत्र्यांचा देखील दरवाजा ठोठावणार आहेत. तुम्ही वेळेतच जागं होऊन सगळ्यांनी एकजूट होऊन, या लोकांचा सामना करण्याची गरज असल्याचे राजू परूळेकर यांनी आपल्या ट्विटर वरून म्हटले आहे.
नवाब मलिक यांच्यावर झालेली कारवाई ही सुरु बुद्धीने झाली असल्याचा अनेक नेत्यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर शरद पवार यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील फोन करून आम्ही तुमच्या सोबत आहोत. भाजपशी आपल्याला दोन हात करावेच लागणार असल्याचे म्हटले आहे. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली आहे.
मविआ सरकार बुळं आहे काय? त्यांच्या प्रत्येक नेत्याचा समज आहे की संघाच्या गेस्टापोंची थाप दुसऱ्याच्या दरवाज्यावर पडणार आहे. पण इतिहास असं सांगतो की, फॅसिस्ट फक्त आक्रमणाने थोपवता येतात. घरात बसुन शहामृग बनुन नाही.
अन्यथा थाप तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर पण पडणार आहे.— Raju Parulekar (@rajuparulekar) February 23, 2022
एकीकडे भाजप विरोधात बोलणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. त्याचे कारण म्हणजे, भारतीय जनता पार्टी विरोधात जो बोलेल त्याच्या मागे केंद्रीय यंत्रणेंचा असाच ससेमिरा लागेल, अशी भीती आता सगळ्यांनाच वाटू लागली असल्याचे देखील बोललं जात आहे. मात्र हे कुठेतरी थांबण्यासाठी यांच्या विरोधात सगळ्यांनी एकजूट होऊन लढणं हाच आज एकमेव पर्याय असल्याचं राजू परूळेकर यांनी म्हटले आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम