शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी भाषेत केल्याने ‘रकुल प्रीत सिंग’ वादाच्या भोवऱ्यात; शिवप्रेमी आक्रमक
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात ‘शिवभक्त’ मोठ्या उत्साहाने साजरी करताना पाहिला मिळतात. प्रत्येक जण 19 फेब्रुवारी या दिवसाची आतुरतेने वाट पाहताना दिसून येतो. शिवजयंती मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी करण्यात प्रत्येक जण मग्न झाल्याचं, या दिवशी पाहायला मिळतं. विविध क्षेत्रात काम करणारी अनेक दिग्गज मंडळी देखील शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांना शुभेच्छा देत असतात. फिल्म इंडस्ट्रीतले अनेक कलाकार देखील शिवाजी महाराजांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देतात.
दाक्षिणात्य चित्रपटांची सुपरस्टार आणि सध्या बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावणारी ‘रकुल प्रीत सिंग हिने’ देखील छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांना शुभेच्छा देताना रकुल प्रीत सिंगने फक्त शिवाजी असाच एकेरी उल्लेख केला असल्याने, आता नवीन वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रकुल प्रीत सिंहने छत्रपती शिवाजी महाराजांना शुभेच्छा देताना, आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी ठेवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्केच असणारा हा फोटो असून, या फोटोखाली फक्त ‘शिवाजी जयंती’ असाच उल्लेख केला आहे. आता या प्रकरणामुळे रकुल प्रीत सिंग चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने, प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराज असाच, महाराजांचा उल्लेख करतो. मात्र आता रकुल प्रित सिंगने फक्त ‘शिवाजी जयंती’ असा उल्लेख केला आहे. महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याने, तीने आता नव्या वादाला आमंत्रण दिलं असल्याचं, सोशल मीडियावर बोललं जातं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याने यापूर्वीदेखील अनेक वाद निर्माण झाले आहेत. अभिनेता शरद केळकर यांना एका पत्रकाराने तुम्ही ‘शिवाजी’ची भूमिका साकारली आहे, असं म्हटलं होतं. त्यावर क्षणात शरद केळकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करणारे, शरद केळकर सारखे अनेक कलावंत पाहायला मिळतात. मात्र दुसरीकडे रकुल प्रीत सिंग सारखे शिवाजी महाराजांचा अपमान करणारे कलावंतही असल्याची खंत सोशल मीडियावरून आता व्यक्त करण्यात येत आहे.
https://instagram.com/stories/rakulpreet/2776931993284802955?utm_medium=share_sheet
सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर प्रत्येकाला आपल्या फॉलोअर्सची संख्या ही अधिक असावी असं नेहमी वाटत असतं. सोशल मीडियावर आपल्या फॉलोवर्समध्ये अनेक धर्मीय लोक असल्याने, सेलिब्रिटी देखील प्रत्येक सणाच्या, उत्सवाच्या लोकांना शुभेच्छा देताना पाहायला मिळतात. मात्र प्रत्येकाच्या धर्माविषयी, आस्थेविषयी फारसं काही माहित नसल्याने, कधी कधी शुभेच्छा देताना गडबड देखील होताना दिसते. असंच काहीसं रकुल प्रीत बाबत देखील घडल्याचं दिसून येत आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम