‘पंकजा मुंडे सुप्रिया सुळे’बाबद बंडातात्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा ‘बोलविता धनी’ दुसराच; धक्कादायक नाव आले समोर
राज्य मंत्रिमंडळाने सुपर मार्केटमध्ये आणि किराणा दुकानामध्ये वाइन मिळणार असल्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक आणि इतर फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे सरकार कडून सांगण्यात आले. मात्र या निर्णयावर राज्यभरातून टीका झाल्याचे पहिला मिळाले. यात काल बंडा तात्या कराडकर यांनी देखील उडी घेतली.
काल साताऱ्यात बंडा तात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त युवक सांघाच्या वतीने ‘दंडवत दंडुका’ आंदोलन करण्यात आले. आणि या आंदोलनाची दिवसभर चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलन दरम्यान बंडा तात्या कराडकर यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना, राज्यातल्या अनेक नेत्यांची मुले दारू पिऊन रस्त्यावर पडत असतात. असे अनेक धक्कादायक खुलासे केले.
बंडा तात्या कराडकर यांनी राज्यातील नेत्यांची मुले दारू पिऊन रस्त्यावर पडत असतात, असं विधान करतानाच त्यांनी खासदार सुप्रिया आणि पंकजा मुंडे यांची देखील नावे घेतल्याने एकच खळबळ उडाली. बंडा तात्या कराडकर यांनी केलेल्या विधानाची राज्यात जोरदार चर्चा झाली, मात्र त्यांनी केलेले हे वादग्रस्त विधान हे त्यांनी जरी केलेले असेल तरी, त्यांचा बोलाविता धनी दुसराच कोणीतरी असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्याचे पाहायला मिळाले.
बंडातात्या कराडकर यांच्यावर या पूर्वी देखील भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा आरोप झाला होता. आणि आता देखील लोकांनी ते भारतीय जनता पार्टीच्याच इशाऱ्यावर नाचत असल्याचे बोलले जात आहे. कारोनाची रुग्ण संख्या वादात असताना देखील बंडा तात्या कराडकर यांनी राज्यातली मंदिरे सरकारने खुली करावी म्हणून, आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले होते. आणि आता देखील राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात बंडातात्या कराडकर आंदोलन केले असल्याचे बोलण्यात येत आहे.
बंडा तात्या कराडकर यांनी केलेले आंदोलन हे त्यांनी स्वतः केले नसून, राज्यातल्या विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून केले असल्याचे, आता सोशल मीडियावर बोलले जाऊ लागले आहे. एवढच नाही तर त्यांनी आंदोलनात सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्याविषयी जे काही निंदनीय भाष्य केले आहे, हे सगळं भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरून केले असल्याचा सुर देखील सोशल मीडियावर उमटू लागला असल्याचं पाहायला मिळत आहे.
बंडा तात्या कराडकर यांनी काल केलेलं आंदोलन नसून, तो एका राजकीय पक्षाचा आयोजित स्टंट होता, असं देखील सोशल मीडियावर बोललं जाऊ लागलं आहे. एवढच नाही तर यामध्ये महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणविस असल्याची शक्यताही नाकारण्यात येत नाही. राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असताना, या संघटना कधीही आंदोलन करताना दिसल्या नाहीत. राज्यातल्या अनेक संघटना आणि समाजसेवक देवेंद्र फडणविस यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे आता सोशल मीडियावर बोललं जाऊ लागलं आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम