धक्कादायक..! पडळकर यांच्या गाडीवर ‘डंपर’ चढवण्याचा कट आखण्यात आला होता; जयंत पाटील, पोलीस कटात सामील

7 नोव्हेंबरला गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांच्या गाडीवर आटपाडी पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या हल्लाचा व्हीडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत आपल्याला जीवे मारण्याचा कट रचण्यात आला असल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील (Jayant patil) आणि पवार कुटुंबियांवर केला आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीवरून (sangli district Bank election) भाजप (bjp) आणि महाविकास आघाडी नेते, (ncp) कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले होते. या राड्यात गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक देखील करण्यात आली होती. तर दुसरीकडे गोपीचंद पडळकर यांनी माझ्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्यचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील राजू जानकर यांनी केला होता. या हल्ल्यात माझा पाय देखील मोडला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते राजू जानकर यांनी केला होता.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीवरून झालेल्या राड्याचा व्हिडिओ पडळकर यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केला आहे. विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत एक जमाव त्यांच्या गाडीवर दगडफेक करताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे रस्त्याच्या दुसऱ्या साईटला एक डंपर उभा आहे. पडळकर यांनी या व्हिडिओचे विश्लेषण करताना म्हटले आहे, हा व्हिडीओ पाहिला तर मला जिवे मारण्याचा सुनियोजित कट रचला गेला होता हे स्पष्ट होतं.

दोनशे-तीनशे लोकांचा जमाव मी येण्यापूर्वीच आटपाडी पोलीस स्टेशन समोर गोळा झाला होता. आणि यांची नोंददेखील माझ्या पोलीस स्टेशनमध्ये आहे. गाडीवर दगडफेक करून माझ्या गाडीचा स्पीड कमी झाल्यानंतर लगेच भरधाव वेगाने येणारा डंपर गाडीवर चढवायचा असा कट रचण्यात आला होता. आणि या कटात स्वतः जयंत पाटील देखील सामील होते, असा गंभीर आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओत पोलीस देखील उपस्थित असल्याचे दिसून येत आहेत. आणि ते मोबाईलद्वारे या घटनेचे ध्वनीचित्रफित टिपताना पाहायला मिळत आहेत.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील पोलिसांच्या या कृत्यावर टीका करताना म्हटले आहे. रक्षकच भक्षकाचं काम करत आहेत. पोलीस राष्ट्रवादीचा कार्यकर्त्याता असल्यासारखं काम करत आहेत. मला जिवे मारण्याचा सुनियोजित कट आखला गेला आहे, याची पोलिसांना माहिती होती. मात्र त्यांनी मला याविषयी माहिती दिली नाही असा गंभीर आरोप गोपीचंद पडळकर यांनी पोलिसांवर देखील केला आहे. एवढंच नाही तर पोलिस देखील या कटात सामील होते, असा थेट आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

राष्ट्रवादीने गेल्या चाळीस वर्षात महाराष्ट्र कसा लुटून खाल्ला आहे, हे मी गेल्या काही महिन्यांपूर्वी ‘घोडडी बैठका’घेऊन लोकांना समजावून सांगत होतो. तेव्हा देखील सोलापुरात माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. महाराष्ट्रभर मी घेत असलेल्या घोंगडी बैठकांना मिळत असणारा रिस्पॉन्स पाहुन राष्ट्रवादीच्या लक्षात आलं. हा गोपीचंद पडळकर आता काही थांबायचं नाव घेत नाही. जर याने असंच चालू ठेवलं तर आपलं दुकान बंद पडेल. आणि म्हणून याच भितीने माझ्यावर हल्ले होतायत. असं देखील गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.